Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : मकर संक्रांती स्पेशल… भोगीची भाजी
    फूड काॅर्नर

    Recipe : मकर संक्रांती स्पेशल… भोगीची भाजी

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 12, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मकर सक्रांती स्पेशलल, मकर संक्रांती विशेष, संक्रांती विशेष, संक्रांती स्पेशल, भोगीची भाजी, भोगीची भाजी रेसिपी, रेसिपी भोगीच्या भाजीची, भोगीची भाजी Recipe, Recipe भोगीची भाजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शैलजा गोखले

    साहित्य

    • छोटी काटेरी वांगी – 1 वाटी (चिरलेली)
    • वाल पापडी – 1 वाटी (सोलून तुकडे केलेली)
    • तुरीचे दाणे – 1 वाटी
    • पावट्याचे दाणे – 1 वाटी
    • मटार – 1 वाटी
    • ओला हरभरा – 1 वाटी
    • गाजर – 1 वाटी (चिरलेला)
    • बटाटा – 1 वाटी (चिरलेला)
    • भुईमूगांमधील ताजे दाणे – 1 छोटी वाटी
    • भाजलेले तीळ – 2 टेबलस्पून (+ 1 टेबलस्पून वरून घालायला)
    • सुकं किसलेलं खोबरं – 2 टेबलस्पून
    • चिंचेचा कोळ – ऐच्छिक (घेतला तर साधारण 1 टेबलस्पून)
    • गोडा मसाला – 2 टीस्पून
    • लाल तिखट – 2 टीस्पून
    • मीठ – चवीनुसार
    • गूळ – 2 टीस्पून
    • चिरलेली कोथिंबीर – मूठभर
    • तेल – 2 ते 3 टेबलस्पून
    • मोहरी – 1 टीस्पून
    • हिंग – पाव टीस्पून

    पुरवठा संख्या – 3 ते 4 व्यक्तींसाठी

    हेही वाचा – Recipe : ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा

    तयारीसाठी लागणार वेळ

    • चिंच गरम पाण्यात भिजवून ठेवून कोळ काढायला – 1 तास
    • भाज्या निवडून धुवून चिरून घ्यायला – साधारणपणे दीड तास
    • मसाला वाटायला – 1 ते 2 मिनिटे
    • पाककृती करण्यासाठी – अर्धा तास
    • एकूण वेळ – दोन तास

    कृती

    1. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कोरड्या करून निवडून घ्या.
    2. वांगी चिरून मीठाच्या पाण्यात ठेवा म्हणजे त्याचा राप निघून जाईल. बटाटा देखील चिरून पाण्यात ठेवा म्हणजे काळा पडणार नाही.
    3. पावटा, हरभरे, तुरीचे दाणे, मटार दाणे तयार ठेवा.
    4. आता एका मोठ्या कढईत फोडणीसाठी तेल घ्या. या भाजीला तुलनेत तेल जरा जास्त लागतं.
    5. तेल तापलं की, त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, हिंग आणि हळद घाला. मग लगेच पावट्याचे दाणे, हरभरे, तुरीचे दाणे, भुईमूगाचे ताजे दाणे आणि मटार घाला. हे दाणे शिजायला जरा जास्त वेळ लागतो. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
    6. एक वाफ आली की, मग त्यात बटाटा, वांग्याच्या फोडी, गाजराचे तुकडे, वाल पापडी घाला आणि सगळं छान मिक्स करून परत एकदा झाकण ठेवा.
    7. मिक्सरच्या छोट्या भांड्यात सुकं किसलेलं खोबरं आणि तीळ एकत्र करून वाटून घ्या.
    8. सगळ्या भाज्या शिजल्या की, वरून तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, गोडा मसाला आणि मिक्सरवर वाटलेला मसाला घालून सगळं मिक्स करा. आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला. आता परत एक वाफ आणावी.
    9. भाजी छान शिजली की, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बाजूला ठेवलेले तीळ घाला.
    10. ही गरमागरम भाजी, बाजरीची तीळ लावलेली भाकरी, ताजं लोणी असा भोगीसाठीचा मेन्यू तयार

    हेही वाचा – Recipe : कोकमाचे सार आणि वाफाळता भात…

    टिप्स

    • ही भाजी झटपट करायची असेल तर पावटा, हरभरे, तुरीचे दाणे, मटार कुकरमध्ये एखादी शिट्टी करून शिजवून मग फोडणीला घाला. वेळेची बचत होईल.
    • या भाजीत काही ठिकाणी छोटी बोरं किंवा उसाचे तुकडेही  घालतात. आवडत असतील तर ते पण भाजीत घालू शकता.
    • भुईमूगाच्या शेंगा मिळाल्या नाहीत तर, साधे शेंगदाणे दोन तास पाण्यात भिजवून ते वापरले तरी चालतील.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn