Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल?
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल?

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 9, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, लिंबं, टोमॅटोचा रस, मटार, खाद्यपदार्थांची साठवणूक, मुळा, मुळ्याचा वास, मुळ्याची ढेकर
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल, जाणून घ्या टिप्स –

    • आपल्याला रोजच लिंबाचा वापर करावा लागतो. लिंबे नेहमी ताजी राहण्यासाठी फिरकीचे झाकण असणाऱ्या काचेच्या बाटलीत (हॉर्लिक्ससारख्या) ठेवल्यास पंधरा- पंधरा दिवस कोणत्याही सीझनमध्ये चांगली राहतात. परंतु लिंबे चांगल्या प्रतीची असावीत. डागाळलेली, खराब झालेली नसावीत. बाटलीचे झाकण नेहमी घट्ट लावावे.
    • टोमॅटो शिजवून त्याचा रस काढून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठ दिवस चांगल्या स्थितीत राहतो. केव्हाही सूप किंवा सार करायला उपयोगात आणता येतो. असा रस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मेणबत्तीने पिशवी बंद करून बर्फाच्या कप्प्यात ठेवल्यास महिनाभरही चांगल्या स्थितीत राहू शकतो. अन्नरक्षके न वापरता, अन्न जीवनसत्त्वे नष्ट न होता रस वापरता येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : वांग्याचे भरीत अन् कढी गोळे बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा…

    • जेवणात मुळा असणे बहुपयोगी आहे. कारण मुळा पाचक आहे. मूळव्याधीवर मुळा अतिशय औषधी आहे. मुळ्यामुळे पोट साफ राहते. पण त्याच्या वासामुळे खाल्ल्यावर ढेकरा येत राहतात. त्यामुळे सर्वजण आवडीने मुळा खात नाहीत. लहान मुले तर घरात मुळा किसल्यापासून त्याच्या वासाबद्दल तक्रार सुरू करतात. यावर उत्तम उपाय म्हणजे जेव्हा आपण मुळा किसायला घेतो, तेव्हाच मंद गॅसवर निर्लेप पॅन ठेवावा. पॅनमध्ये दोन वाट्या मुळ्याचा किस असेल तर दोन चमचे साजूक तूप घालून तूप-जिऱ्याची फोडणी करावी आणि मुळ्याचा किस त्यात घालावा आणि परतावे. साधारण कोरडे झाल्यावर खाली उतरवावे (वेळ अजिबात लागत नाही आणि निर्लेप पॅनमुळे खाली चिकटत नाही). मुळा तिखट असल्यास त्याचा तिखटपणा पूर्णपणे जातो आणि दिवसभर मुळ्याची जी ढेकर येत राहते, ती अजिबात येत नाही. किस गार झाल्यावर त्यात गोडसर साईखालचे दही, दाण्याचे कूट, मीठ, साखर घालून कोशिंबीर करावी. अजिबात पचपचीत होत नाही आणि मुळ्याचा वासही येत नाही.

    हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना…

    • मटारच्या दिवसात चार-पाच किलो शेंगा विकत घ्याव्यात. त्या सोलून दाणे वेगळे करावेत. एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात पाणी उकळायला ठेवावे आणि त्यात एक चमचा साखर टाकावी. पाणी उकळायला लागले की, गॅस बंद करून त्यात मटारचे दाणे टाकावेत. दोन मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर ते निथळून कोरड्या कपड्यावर टाकून पंख्याखाली सुकवावेत. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून, पिशव्यांची तोंडे घट्ट बांधून त्या डीप फ्रीजरमध्ये ठेवाव्यात. गरज असेल तेव्हा डीप फ्रीजरमधून दाणे काढून थोडा वेळ साध्या पाण्यात टाकून ठेवावेत. ते अगदी ताज्या मटारच्या दाण्यांसारखे लागतात. वर्षभर टिकतात.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn