Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»शैक्षणिक»बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील भाषा शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील भाषा शिक्षण

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेDecember 15, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, शाळाप्रवेश, बालशाळा अभ्यासक्रम, भाषा अभ्यास, संवादाची भाषा, बडबडगीते, गप्पागोष्टी, एक साथ नमस्ते,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील तीन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची

    सविस्तर माहिती घेतली. आता या आणि पुढील लेखांत आपण बालशाळेतील अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या अत्यंत महत्त्वाचा विषयासंबंधी जाणून घेणार आहोत. यात मातृभाषा शिक्षण गृहीत धरले आहे.

    मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा. सगळ्यांशी संवाद साधण्याचे हे साधन आहे. यातूनच भाषा शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची खेळगट या वर्गासंबंधित जाणून घेणार आहोत.

    वास्तविक, मुलांचे भाषा शिक्षण जन्मापासूनच सुरू होते. आई आपल्या बाळाशी सतत बोलण्यातून संवाद साधत असते. तसेच, घरातील कुटुंबीय देखील बाळाशी बोलत असतात. यातूनच मुलाच्या भाषा शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. काही मुलं लवकर बोलायला सुरुवात करतात, तर काही उशिरा. मुलं त्यांच्याशी बोललेलं सगळं ऐकत असतात आणि मनात साठवत असतात, याची नोंद मुलांच्या मेंदूत होत असते. यातूनच मग मुलं भाषेद्वारे बोलायला लागतात. यावरून मुलांशी सतत बोलत राहण्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटासाठी हस्त व्यवसाय

    खेळगटात आलेली बहुतांशी मुलं बोलू शकतात. मुलांचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी खेळगटात विविध उपाय योजना अमलात आणल्या जातात.

    • बडबडगीते
    • गप्पागोष्टी
    • मुलांना माहीत असलेल्या गोष्टींविषयी संवाद

    मुलांना नवीन गोष्टी माहीत करून देण्यासाठी संवाद

    या उपाय योजनांबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात.

    1. वर्ग सुरू झाल्यावर मुलांना हात जोडून ‘नमस्ते’ म्हणणे आणि मुलांना तसे करायला शिकवणे. यातूनच मुलं शब्द आणि कृती यांचा समन्वय साधण्यास शिकतात.
    2. खेळगटातील मुलांना सतत बोलण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते. मुलांना बडबडगीतातील ताल आणि लय आवडते, म्हणून मुलं बडबडगीते आवडीने म्हणतात. हळूहळू मुलांना बडबडगीतातील शब्दांचे अर्थ समजावून सांगितले जातात. तसेच, तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा आले की, मुलांचा मेंदू त्यांची नोंद घेत असतो.
    3. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी गप्पागोष्टींचा तास नक्की घ्यावा. मुलांनी सुट्टीच्या दिवशी काय-काय केलं, असं विचारून बोलण्यास उद्युक्त करावे.
    4. मुलांचा काल, आज आणि उद्या यात गोधळ होतो. मुलांकडून ते सुधारून परत म्हणून घ्यावे. मुलं मग हळूहळू समजून घेऊन तयार होतात.
    5. मुलांना माहीत असलेल्या विषयांबद्दल त्यांच्याशी बोलावे. उदाहरणार्थ, घर, घरातील सदस्य इत्यादी. यासाठी मुलांबरोबर वैयक्तिक संवाद साधावा. जिथे मुलांना सांगता येत नसेल, तिथे त्यांना प्रेरित करून बोलते करावे.
    6. मुलांना खेळायला दिलेल्या साधनांची आणि खेळांची नावे प्रत्येक वेळेस आवर्जून सांगावीत. यातूनच मुलांना समजायला लागेल.
    7. मुलांना बाग आवडते आणि ती बागेत नेहमीच जातात. मुलांशी बागेतील झाडं, फुलं, वेली, विविध खेळणी याविषयी बोलावे.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटासाठी हस्त व्यवसाय

    थोडक्यात, मुलांना माहीत असलेल्या तसेच माहीत करून दिलेल्या विविध गोष्टींबद्दल वारंवार प्रश्न विचारून उत्तरे देण्यास शिकवावे. असे केल्यास मुलांचा शब्दसंग्रह वाढत जाऊन त्यांची आकलन शक्ती देखील वृद्धिंगत होईल.

    पुढील लेखात आपण शिशुगटातील भाषा शिक्षण या विषयाबाबत जाणून घेणार आहोत.

    क्रमश:

    Author

    • रश्मी परांजपे
      रश्मी परांजपे
    रश्मी परांजपे

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn