Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»शैक्षणिक»बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटासाठी हस्त व्यवसाय
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटासाठी हस्त व्यवसाय

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेDecember 8, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, शाळाप्रवेश, बालगट अभ्यासक्रम, हस्तव्यवसाय, कागदकाम, चित्रकला, चित्र रंगवणे, ठसे काम,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची शिशुगट या वर्गासंबंधित सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची बालगट या वर्गासंबंधित जाणून घेणार आहोत.

    बालगटातील मुलं आता थोडी मोठी झालेली असतात. बाई आपल्याला काय सांगतात, कशी कृती करायला सांगतात, याकडे मुलं आता लक्ष देऊन ऐकतात. मुलांना आता तेवढी समज आलेली असते. म्हणून मुलांना जरा अवघड स्वरुपाचा हस्त व्यवसाय देण्यात येतो. हस्त व्यवसायात कागदकाम, ठसेकाम आणि चित्रकला या तीन प्रमुख उपक्रमांचा समावेश करण्यात येतो. आता आपण या उपक्रमांबद्दल माहिती घेऊयात –

    कागदकाम

    फाडकाम आणि चुरगाळाकाम

    सुरुवातीला मुलांकडून फाडकाम आणि चुरगाळाकाम याची उजळणी करून घ्यावी. मुलं आता ही कामे सफाईने करू लागतात.

    चिकटकाम

    कागदाचे केलेले छोटे तुकडे आणि घट्ट चुरगाळे हस्त व्यवसाय वहीत चिकटवायला मुलांना सांगितले जाते. शिक्षिकेने मार्गदर्शन करण्याऐवजी फक्त देखरेख करावी. बहुतेक सर्व मुले थोड्या प्रमाणात डिंक वापरून रंगसंगती साधून स्वतःच्या मनाने एखादे डिझाइन ठरवून चिकटकाम करतात.

    घडीकाम

    शिशुगटात शिकवलेली चौरस कागदाची रुमालाची घडी, आयताकृती कागदाची पंख्याची घडी याची मुलांकडून उजळणी करून घ्यावी. मुलं आता चौरस आणि आयत या आकारांनुसार वर्गीकरण करतात का? याचे शिक्षिकेने निरीक्षण करून नोंद करून ठेवावी. चौरस आणि आयत या आकृतींची माहिती हा गणित विषयाचा भाग आहे.

    यानंतर मुलांना कागदाच्या घड्या घालून कपबशी, घर, कुत्र्याचे कान असे आकार करायला  शिकवले जाते. मुलांकडून केलेल्या कागदांच्या अशा घड्या त्यांची नावे घालून हस्त व्यवसाय वहीत चिकटवून घेतल्या जातात.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटासाठी हस्त व्यवसाय

    ठसेकाम

    मुलांना भेंडी, हाताची बोटे, कापसाचे बोळे, झाडांची छोटी-छोटी पाने यांचे ठसे द्यायला सांगावे. मुलं आता सरावाने आकर्षक रंगसंगती आणि डिझाइन स्वतःच्या मनाने करून ठसेकाम करतात.

    चित्रकला

    चित्र काढणे

    • शिशुगटात मुलं गोलातील तसेच चौकोनातील चित्रे काढण्यास शिकतात. आता स्थुलातून सूक्ष्माकडे या तत्वानुसार मुलांना अवघड चित्रे काढण्यास शिकवावे. यासाठी फळ्यावर चित्रे अवश्य काढावीत.
    • यानंतर मुलांना गोल, चौकोन, सरळ रेषा यांचा उपयोग करून माणसाची आकृती आणि इतर चित्रे काढण्यास शिकवतात.
    • यानंतर मुलांना देखावा प्रकारात डोंगर, त्याच्यामागून उगवणारा सूर्य, आकाशात पक्षी, डोंगराच्या पायथ्याशी वाहणारी नदी, नदीकाठची घरे अशी चित्रे काढून देखावा पूर्ण करण्यास शिकवले जाते.
    • मुलांकडून नंतर झाडं, फुलं, पानं, घसरगुंडी, झोपाळा इत्यादी चित्रे काढून बागेच्या देखाव्याचे चित्र काढण्यास शिकवतात.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटासाठी हस्तव्यवसाय

    चित्र रंगवणे

    बालगटातील मुलांना थोडी अवघड चित्रे रंगविण्यास देता येतात. चित्र रंगविण्यासाठी खूप पुस्तके बाजारात उपलब्ध असतात. या पुस्तकांत देखील स्थुलातून सूक्ष्माकडे याच तत्वाचा अवलंब केलेला दिसून येतो. मुलांना फुलं, पाकळ्या, आकाशकंदिल, सोपी रांगोळी, फुग्यांचा गुच्छ अशा प्रकारची चित्रे रंगविण्यास देतात. चित्रं खूप मोठी असू नयेत, ही काळजी मात्र अवश्य घ्यावी.

    बालगटातील हस्त व्यवसायातून स्नायू नियंत्रण, रेषाकृतींचा परिचय, रंग ओळख, नीटनेटकेपणा, कल्पकता, एकाग्रता अशा अनेक गोष्टी साधल्या जातात.

    थोडक्यात सांगायचे झाल्यास, बालगटातील मुलांची हस्त व्यवसायाच्या विविध उपक्रमांतून अधिकाधिक प्रगती होते आणि यातूनच मुलांना शिक्षण मिळत राहते.

    पुढील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील ‘भाषा’ या विषयाबाबत जाणून घेणार आहोत.

    क्रमश:

    Author

    • रश्मी परांजपे
      रश्मी परांजपे
    रश्मी परांजपे

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn