Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : …तैसें चित्त लया जाये आणि चैतन्यचि आघवें होये
    अध्यात्म

    Dnyaneshwari : …तैसें चित्त लया जाये आणि चैतन्यचि आघवें होये

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 8, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय सहावा

    शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया । आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत् ॥25॥

    यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।  ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥26॥

    बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥378॥ याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं । हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥379॥ आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला – । बाहेरा नोहे ॥380॥ जरी येतुलेनि चित्त स्थिरावे । तरी काजा आलें स्वभावें । न राहे तरी घालावें । मोकलुनी ॥381॥ मग मोकलिलें जेथ जेथ जाईल । तेथूनि नियमुचि घेऊनि येईल । ऐसेनि स्थैर्याची होईल । सवे यया ॥382॥

    प्रशांतमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् । उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥27॥

    पाठीं केतुलेनि एकें वेळें । तया स्थैर्याचेनि मेळें । आत्मस्वरुपाजवळें । येईल सहजें ॥383॥ तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥384॥ आकाशीं दिसे दुसरें । ते अभ्र जैं विरे । तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥385॥ तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये । ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥386॥

    युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः । सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥28॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें हितासि जें जें निकें, तें सदाचि या इद्रिंयां दुःखे…

    अर्थ

    धैर्ययुक्त असा बुद्धीने हळूहळू (बाह्य प्रपंचापासून मनाचा) उपरम (निवृत्ती घेऊन) करावा आणि मनाला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करून, दुसर्‍या कशाचेही चिंतन करू नये. ॥25॥

    चंचल वृत्ती (अत एव) अस्थिर असे मन (आत्म्याकडून निघून) ज्याच्या ज्याच्यामुळे बाहेर जाते, त्याच्या त्याच्यापासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात आणावे. ॥26॥

    बुद्धी जर धैर्माला आश्रयस्थान झाली तर, ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. ॥387॥ याही एक तर्‍हेने ब्रह्मप्राप्ती आहे. याचा विचार कर आणि हे जर तुला साध्य होत नसेल, तर आणखी एक सोपी युक्ती आहे, ती ऐक. ॥379॥ आता तू जो निश्चय करशील त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही, अशा प्रकारचा हा एकच नियम जीवाभावापासून तू आपलासा कर. ॥380॥ जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले आणि जर एवढ्याने ते स्थिर झाले नाही तर, त्याला मोकळे सोडून द्यावे. ॥381॥ मन मोकळे सोडले असता, ते जेथे जाईल तेथून नियमच त्यास परत घेऊन येईल. अशा रीतीने यालाही स्थैर्याची सवय होईल. ॥382॥

    (याप्रमाणे अभ्यास केल्याने) ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पापपुण्यादिकांविरहित आहे आणि जो ब्रह्मस्वरूप झाला आहे, अशा योग्याला श्रेष्ठ सुख प्राप्त होते. ॥27॥

    नंतर काही एक वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. ॥383॥ आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्याबरोबर, ते मन स्वत: आत्मस्वरूप बनून जाईल, तेव्हा त्या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल, आणि नंतर हे सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. ॥384॥ आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ, ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेले असते ॥385॥ त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेले की, संपूर्ण विश्वच चैतन्यमय होते. या सुलभ उपायाने अशी (एवढी मोठी) प्राप्ती होते. ॥386॥

    या प्रकारे सर्वदा मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापांनी विरहित होतो आणि अनायासाने ब्रह्मसाक्षात्काररूपी आत्यंतिक सुख भोगतो. ॥28॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : जया सुखाचिया गोडी, मग आर्तीची सेचि सोडी…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn