Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ…

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 6, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, पिवळे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ, केळा वेफर्स, तळलेली डाळ, हरभरा डाळ
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये केळ्याचे पिवळे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ बनविण्याच्या टिप्स पाहुयात.

    • पिवळे वेफर्स : प्रथम अगदी कच्ची राजेळी केळी घ्यावीत. त्यांची साले काढून घ्यावीत. नंतर किसणीने त्याचे जाडसर काप करावेत. ते साधारण अर्धा तास कोरड्या फडक्यावर पसरावेत. नंतर गरम तेलामध्ये तळावेत, अर्धवट तळून झाल्यावर त्यावर मिठाचे पाणी मारावे. पाणी कढईतच वेफर्स असताना मारावे. पाणी जास्त तडकत नाही आणि तेलही उडत नाही. नंतर वेफर्स पूर्णपणे तळून झाल्यावर बाहेर काढावेत. बाजारात केळ्याचे पिवळे वेफर्स मिळतात, ते या प्रकारेच करतात. आवडत असल्यास गोडेतेलाऐवजी खोबरेल तेल वापरावे. सुंदर स्वाद येतो.
    • पपई कधी कधी कमी गोड आणि पूर्ण पिकलेली नसते. अशा वेळी त्या पपईची भजी करावीत. एक वाटी पपई किसात अर्धी वाटी मैदा, चवीप्रमाणे मीठ, जिरेपूड, मिरच्या बारीक चिरून, कोथिंबीर, आले बारीक किसून घालावे आणि तेलात भजी तळावीत. यात रवा-मैद्याऐवजी साबुदाणा किंवा उपवासाची भाजणी घातल्यास उपवासाचा उत्तम पदार्थ तयार होईल.

    हेही वाचा – Kitchen Tips : घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक…

    • हरभऱ्याची तळलेली डाळ करण्यासाठी आपण ती भिजत टाकतो, त्या वेळी त्यात चमचाभर दूध टाकावे. डाळ चांगली भिजल्यावर टोपलीत उपसून ठेवून थोडी सुकली की तळावी. त्यामुळे डाळ अधिक खुसखुशीत होते आणि कुरकुरीत राहते. तेलकटही होत नाही.
    • चिवड्यासाठी पातळ पोहे भाजून घ्यावेत. भाजलेले पोहे चाळून घ्यावेत. खाली राहिलेला पोह्याचा चुरा मिक्सरमधून बारीक करून ठेवावा. हे भाजलेले चुऱ्याचे पीठ भजी करताना भज्याच्या पिठात घालावे. त्यामुळे तेल कमी लागते आणि चुऱ्याचा उपयोग होतो. शिवाय भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात.
    • चकल्या खुसखुशीत पाहिजे असतील, तर मुगाची डाळ शिजवून चकलीच्या पिठात चकली करायच्या वेळेला चांगली मळावी. मोहन कमी घातले तरी चालते.

    हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी…

    • उत्तप्पा, डोसा, टोमॅटो आम्लेट वगैरे करताना तवा जर साधा असेल तर आम्लेट वगैरे चिकटतात. कधी कधी तुकडे होतात. असे होऊ नये म्हणून साधारण तयार पिठात एक वाटी पिठाला एक टी-स्पून या प्रमाणात कणीक घालावी. डोसे, आम्लेट अजिबात चिकटत नाहीत.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn