Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»शीख युवकाने पगडी उतरवली… अज्ञात व्यक्ती शांतच होती!
    ललित

    शीख युवकाने पगडी उतरवली… अज्ञात व्यक्ती शांतच होती!

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 5, 2025Updated:March 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्या, आराध्या शिवा, आराध्याचे आईवडील, आराध्याचा लढा, आराध्याचे रूप, आराध्या तन्वी, तन्वीचा उर्मटपणा, आराध्याचा साधेपणा, दादा गुरूंचे दर्शन, दादा गुरुंचा आशीर्वाद, आराध्याचा नवा अध्याय, आराध्याचा नवा प्रवास,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 3

    ती व्यक्ती आता अनोळखी राहिली नव्हती. त्या माणसाकडून कोणताही धोका नाही, याची त्या शीख युवकाला ठाम खात्री पटली होती. जंगलातला एकांत, त्या दिवसाचा थकवा आणि पोटातलं समाधान… या सगळ्यांनी मिळून त्याच्या मनातल्या वादळांना थांबवलं होतं. तो मोकळा श्वास घेत शांत बसला आणि पहिल्यांदाच, त्या अज्ञात व्यक्तीकडे पाहून त्याला वाटलं, “मी इथे काही काळ सुरक्षित आहे!”

    त्या अन्नाने शरीरात ऊर्जा परत आली होती. आता मन थोडं स्थिर झालं होतं. आजूबाजूचं जंगल, त्या गुहेचा अंधुकसा आडोसा आणि समोर बसलेली ती शांत पण गूढ व्यक्ती… या सगळ्याकडे पाहात तो युवक थोडा वेळ गप्प बसला.

    थोड्या वेळाने त्याने आजूबाजूचा कानोसा घेतला आणि मग हळूहळू जरा धाडस करून विचारलं,

    “तुम्ही इथे कधीपासून राहता?”

    या प्रश्नावर त्या व्यक्तीने थोडा विचार केला, नजरेत क्षणभर अंधुक आठवणी चमकल्या… आणि मग तो म्हणाला, “जेव्हापासून आहे… तेव्हापासून इथेच आहे. दिवस, महिना, वर्षं… मोजणं सोडलंय मी. हे जंगलच माझं घर आहे आता.”

    तो युवक थोडा चकित झाला. त्याच्या नजरेत अजून प्रश्न होते… पण त्या व्यक्तीनेच त्याला विचारलं,

    “तू मराठी बोलतोस… म्हणजे तू शीख नाहीस. मग तू कोण आहेस? इथे कसा? आणि ते गुंड तुझ्या पाठी का लागले होते?”

    हे ऐकताच युवक थोडा सावध झाला. त्याचं हसू हरवलं. चेहरा गंभीर झाला… त्या व्यक्तीच्या त्या शांत, समजूतदार डोळ्यांनी त्याचं खरं रूप ओळखलं होतं… पण तिथं कुठलाही आरोप नव्हता, फक्त एक जिज्ञासा होती.

    त्या व्यक्तीकडं नजर टाकताच युवकाच्या मनात विचारांचा कल्लोळ उसळला… “का खोटं बोलावं? याने आपला जीव वाचवला… गुहेत लपवलं… त्या गुंडांपासून वाचवलं… आज ही व्यक्ती नसती, तर मी त्यांच्या हाती…!”

    त्या विचारानं त्याच्या अंगावर काटा आला. डोळ्यासमोर त्या गुंडांची भयानक चेहऱ्यांची प्रतिमा तरळली. हातातली शस्त्रं, रोखलेली भीतीदायक नजर… आणि आपण त्या जंगलात भेदरलेल्या प्राण्यासारखा पळत होतो… आपसूकच त्याच्या कपाळावर घामाच्या धारा येऊ लागल्या. त्याचं सर्वांग घामानं डबडबून गेलं. त्या थकव्यानं आणि आठवणींच्या भारानं त्याचं श्वास घेणंही थोडं अस्थिर झालं. पण समोर बसलेल्या व्यक्तीच्या शांत नजरेनं त्याला सावरलं.

    हेही वाचा – तू भेटशी नव्याने…

    तो आता बोलण्यासाठी सज्ज होता… खरं सांगण्यासाठी तयार होता…

    गुहेतलं शांत वातावरण आता पूर्णपणे वेगळ्या अर्थाने गूढ झालं होतं. या व्यक्तीमुळेच आपण सुरक्षित आणि जिवंत आहोत… इतक्या वेळात आपल्याला कळून चुकलंय की, या व्यक्तीपासून आपल्याला मुळीच धोका नाही… उलट आपण इथेच राहू शकलो तर…?

    माणसाचं मन किती भरभर विचार करत ना?  त्याने एकदम त्या व्यक्तीकडे पाहिलं… त्याची नजर स्वच्छ होती…

    “नाही, मी शीख नाही…” डोक्यावर बांधलेली पगडी त्याने काढली… त्याचे केस मोकळे झाले… डोक्याला आणि केसांना हवा लागली, तसं त्याला बरं वाटलं. आपल्या चेहऱ्यावरची दाढी आणि मिशी त्याने काढली…

    त्या व्यक्तीच्या डोळ्यात आश्चर्य नव्हतं, उलट एक शांत भाव होते.

    “मी शीख युवक नाही… मी एक…”

    “मुलगी आहेस…”  ती व्यक्ती पटकन म्हणाली. तसं त्याने… नाही तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं…

    “त्या क्षणी… ज्या क्षणी तुला वाचवण्यासाठी मी स्पर्श केला… त्या क्षणीच समजलं होतं मला — तू एक स्त्री आहेस.”

    आता मात्र ती थक्क झाली. ती म्हणाली, “तुम्हाला कसं कळलं?”

    त्या व्यक्तीने हळू आवाजात उत्तर दिलं, “डोळ्यांनी पाहाणं एक गोष्ट असते… पण अनुभव डोळ्यांशिवाय जाणवतात. तू ज्या पद्धतीने थरथरत होतीस, तुझ्या स्पर्शातली ती भीती… आणि किंचाळी… ती फक्त प्राण वाचवण्याची नव्हती, ती प्रतिष्ठा, अस्तित्व आणि सगळं काही वाचवण्याची होती.”

    गुहेच्या त्या अंधाऱ्या, पण आता कुठे कुठे मूक शांततेने साक्षी राहिलेल्या कोपऱ्यात, अदितीची मनमोकळी भावना अखेर वाहू लागली. डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळत होते… भीतीचे, सुरक्षिततेचे आणि त्या व्यक्तीच्या न बोलता समजून घेणाऱ्या वागणुकीमुळे मनाला आलेल्या शांततेचे…

    ती सुबकशी चेहऱ्याची, पण संघर्षांनी खारटलेली. पगडीच्या आड लपवलेलं तिचं खरं अस्तित्व, आता केसांबरोबर मोकळं झालं होतं.

    एक झुळूक आली — शांत, मंद, समजूत घालणारी.

    तिचे लांब, काळसर केस हवेवर नाचू लागले. तिने त्यांना एका हाताने अलगद मागे घेतलं, आणि दुसऱ्या हाताने डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसले. चेहरा आता थोडा उजळला होता.

    ती हलक्या आवाजात म्हणाली, “मी कोण आहे, हे कळू नये म्हणूनच मी तो गेटअप केला होता… पगडी, दाढी, उंच आवाजात बोलणं… सगळं अवघड होतं, पण गरजेचं. पण… हे लोक… कसं कळलं त्यांना? मला वाटतं बराच वेळ ते माझ्या पाठी लागलेलेच होते. कुठून पाहात होते, कळलंच नाही.”

    तिच्या आवाजात एक थकवा होता, पण आता तो एकटेपणाचा नव्हता.

    ती व्यक्ती शांतपणे तिचं बोलणं ऐकत होती. त्यांची नजर अजूनही तिच्या चेहऱ्यावर स्थिर होती, पण न कुठली भावना उघडपणे दाखवत, न कुठली चौकशी करत… नजरेतूनच त्यानं पुन्हा एकदा आश्वस्त केलं.

    “घाबरू नकोस…” त्याने नुसत्या स्वरात म्हटलं, “तुला इथे कोणत्याही मनुष्याकडून धोका नाही… अगदी मलाही तू घाबरू नकोस.”

    आता तिच्या डोळ्यांत पुन्हा एकदा अश्रू जमा झाले — पण यावेळी ते भीतीचे नव्हते, ते होते विश्वासाचे.

    त्या शांत गुहेत एक क्षणभर भयंकर वास्तवाची सावली डोकावून गेली. बाबाजीने तिच्या डोळ्यात खोल डोकावून पाहिलं आणि थोड्याशा कठोर पण काळजीयुक्त स्वरात विचारलं, “पण तू इथे जंगलात कशी काय शिरलीस? त्या गुंडांपासून सुटलास, ठीक… पण जंगली प्राणी? साप, हिंस्र पशू… काहीच भीती वाटली नाही तुला?”

    तिने एक खोल श्वास घेतला. तिचा चेहरा एक क्षण काळजीने गडद झाला… तिने नजर न चुकवता उत्तर दिलं, “त्या माणसांपासून सुटका करायची होती… म्हणून जीव मुठीत घेऊन धावत होते. हे जंगल मला मारेकरी वाटलं नाही. जंगली प्राणी एकदाच मारतील जिवाशी. पण माणूस… माणूस जिवंत ठेवून शरीराचे एक एक लचके तोडतो… हसत.”

    त्या एका वाक्याने गुहेच्या थंड हवेत एक थरारक कंप पसरला.

    ती व्यक्ती काही क्षण गप्प राहिली. तिच्या शब्दांमागचं दुःख, भय आणि तिरस्कार त्याने ओळखला. तो एक भयानक अनुभव होता — कुण्या एका स्त्रीच्या जीवनात खोलवर कोरलेला — ज्याला शब्द देणं म्हणजे त्या जखमेवर मीठ चोळणं!

    त्या व्यक्तीच्या मनात एक विचार वारंवार घोळत होता… “नशीब… नशीब की ही इथे आली आणि मी वेळेवर पोहोचलो. त्या गुंडांच्या हाती लागली असती… तर काय झालं असतं?”

    तो विचार त्याच्या चेहऱ्यावर उमटला नाही, पण डोळ्यांतील काळजी अधिक तीव्र झाली. त्याने हलक्या आवाजात, स्वतःशीच बोलल्यासारखं म्हटलं, “जंगल रक्त पीत नाही, ते शांतताच देतं… पण माणूस, जर पशूत उतरला… तर जंगलही थरारतं.”

    ती आता शांत होती. तिचं मन हलकं झालं होतं…

    त्या गडद संध्याकाळी, गुहेत हलकीशी शांतता पसरलेली होती. निखाऱ्यांवरचा प्रकाश आता मंद झाला होता आणि त्याच प्रकाशात तिचा चेहरा अधिकच निरागस वाटत होता. पोटात अन्न गेल्यानं आणि मनावरचं ओझं थोडं हलकं झाल्यानं, तिच्या डोळ्यांवर झोपेची झापड अलगद उतरली. केसांच्या बटा गुंतलेल्या, पण चेहरा शांत. तिची एक मूक विश्रांती सुरू झाली. त्याने तिच्या पगडीच्या कापडाचा उपयोग करून गुहेतल्या पालापाचोळ्यावर तिला एक साधं पण मऊ अंथरुण तयार करून दिलं. तिने त्यावर अंग टाकलं आणि क्षणातच ती गाढ झोपी गेली. त्या निसर्गनिर्मित गादीत जणू जरा सुरक्षिततेची उब होती… ती झोपेत कूस बदलत होती, आणि प्रत्येक श्वासासोबत तिचा थकवा जणू हवेत विरत होता.

    हेही वाचा – अज्ञात व्यक्तीच्या स्मितहास्याने तरुणाच्या मनातील वादळे शमली!

    ती व्यक्ती मात्र तिथं निवांत बसली नव्हती. त्याच्या मनात विचारांची नुसती गर्दी झाली होती… “ही इतकी गोड, देखणी मुलगी… आपल्या घरापासून, माणसांपासून इतकी दूर जंगलात का आली? काही घडल्याशिवाय एखादी मुलगी असं जीव मुठीत घेऊन जंगलात शिरेल का? तिच्या घरच्यांना माहीत असेल का ती इथे आहे? शोधत असतील का तिला…?”

    त्या अनुत्तरित प्रश्नांनी त्यांचं मन थोडं व्याकूळ झालं. पण त्या क्षणी एक गोष्ट स्पष्ट होती, ती आता इथे आहे, सुरक्षित आहे, आणि सध्या तिला झोपेची गरज आहे. त्याने मग एकदा तिच्याकडे नजर टाकली… एक गूढ शांतता तिच्या चेहऱ्यावर पाहिली आणि मग सावधपणे गुहेच्या झडपेकडे वळला. त्याने ती झडप नीट बंद केली, बाहेरच्या कोणत्याही आवाजाचा आत प्रवेश होऊ नये, याची खात्री करून घेतली.

    गुहेच्या आत एक गूढ आणि सुरक्षित रात्र उतरू लागली होती… आणि त्या दोघांच्या अनोख्या भेटीची पहिली रात्र होती ती…

    क्रमश:

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn