Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : वेगळ्या चवीची कोथिंबीरवडी, खुसखुशीत मेदूवडा, कुरकुरीत शेव…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : वेगळ्या चवीची कोथिंबीरवडी, खुसखुशीत मेदूवडा, कुरकुरीत शेव…

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 4, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, टेस्टी डोसे, वेगळी कोथिंबीरवडी, खुसखुशीत मेदूवडा, कुरकुरीत शेव, हलक्या इडल्या
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये वेगळ्या चवीची कोथिंबीरवडी, खुसखुशीत मेदूवडा, कुरकुरीत शेव बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहूयात –

    • इडलीचे पीठ भिजवताना त्यात काही जण सोडा किंवा बेकिंग पावडर टाकतात. ते न करता कांद्यावरचा पापुद्रा काढून तसेच देठाचा भाग कापून धुऊन पिठात ठेवावा. पीठ छान आंबते आणि इडली खूप हलकी होते. कांदा अमोनियासारखे काम करतो तर, सोडा अपायकारक असतो.
    • आपण नेहमी करतो त्यापेक्षा जरा वेगळ्या प्रकारे कोथिंबिरीच्या वड्या पुढीलप्रमाणेही करता येतात – प्रथम मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी आणि त्यात साधारणपणे कोथिंबिरीच्या निम्म्याने पाणी फोडणीत टाकावे. लसूण, मिरची (लाल तिखट), ओवा, जिरे बारीक करून त्यात घालून चांगली उकळी आणावी. चवीपुरते मीठ घालून स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाकून शिजवावी. नंतर त्यात बसेल एवढे बेसनपीठ घालून घट्ट गोळा करावा व दणदणीत वाफा आणून खाली उतरवावे. नंतर त्यावर लिंबू पिळून किंवा फोडणीत आंबट ताक घातले तरी चालते. त्याच्या तेल लावलेल्या ताटात वड्या पाडाव्यात. यामध्ये उकडणे, तळणे हे वाचून तेलाची बचत होते आणि ज्यांना तळकट खायचे नाही त्यांनाही उपयुक्त ठरते.

    हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी…

    • नेहमी इडली करताना आपण फक्त उडदाची डाळच भिजत घालतो. उडदाच्या डाळीत एक मूठभर मटकीची डाळ आणि चमचाभर मेथी भिजत घालावी. चार- पाच तास भिजल्यावर सर्व एकदम मिक्सरमधून काढावे. त्याच वेळी डाळीत थोडे तेल आणि व्हिनीगर घालावे. पीठ खूप फुगते. इडल्या हलक्या, मऊ, चकचकीत होतात.
    • दहीवडे किंवा वडा-सांबार करताना उडदाचे पीठ घाईगडबडीत थोडेफार सैल झाल्यास त्या अंदाजानुसार मूठभर पातळ पोहे टाकावेत आणि डावाने ढवळावे. पंधरा मिनिटांनी पुन्हा ढवळावे आणि वडे तळावेत. हे वडे खुसखुशीत आणि हलके होतात.

    हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग

    • डोसे करताना तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडीदडाळ घेऊन, तुरीची डाळ- पाव वाटी, मेथी- पाव चमचा वेगळी भिजवावी. हे सर्व रात्री वेगवेगळे वाटून एकत्र करून फेटावे. दुसऱ्या दिवशी डोसे करावेत. तुरीची डाळ आणि मेथीमुळे डोसे जास्त कुरकुरीत, पातळ होतात आणि तव्यावरून आपोआप कडा सुटून येतात. तव्याला चिकटत नाहीत.
    • शेव तयार करताना डाळीच्या पिठात उकडलेल्या बटाट्याचा किस आणि पापडखार, थोडे गरम तेल, हिंग, मीठ, ओवा घाला. विकतची महाग शेव, शिवाय खराब तेलामुळे घसा धरण्यापेक्षा घरी केलेली शेव चांगली तर होतेच, शिवाय, भरपूरही!

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn