Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : मिरचीची भजी, खिचडीचे परोठे, शेंगदाणा भजी…
    फूड काॅर्नर

    Recipe : मिरचीची भजी, खिचडीचे परोठे, शेंगदाणा भजी…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 29, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मिरचीची भजी, खिचडीचे परोठे, शेंगदाणा भजी, घरगुती केक,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मिरचीची भजी, खिचडीचे परोठे, शेंगदाणा भजी बनविण्याच्या टिप्स पाहुयात.

    • मिरचीची भजी खाताना वरचे आवरण खाऊन मिरच्या तिखट लागतात म्हणून टाकून दिल्या जातात. म्हणून ही भजी करायच्या अगोदर मिरच्यांना मध्यभागी चीर पाडून हळद आणि मिठाच्या पाण्यात तासभर बुडवून ठेवाव्यात आणि नंतर फडक्यावर निथळून कोरड्या कराव्यात. मग एक एक मिरची पिठात बुडवून भजी तळावीत. खाताना मिरची तिखट लागत नाही आणि हळदीमुळे मिरचीलाही खमंग चव येते.
    • आंब्याची डाळ करण्याची चांगली पद्धत म्हणजे, डाळ 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन मग भिजत घाला. त्यामुळे डाळीचा उग्र वास निघून जातो. डाळीत घालण्यासाठी कैरी एक-दोन तास अगोदर किसा आणि त्याला मीठ लावून ठेवा, म्हणजे कैरीचा आंबटपणा उतरेल. नंतर डाळ वाटून त्यामध्ये ही ओली कैरी घाला. म्हणजे कैरीचा राहिलेला आंबटपणा सगळीकडे लागेल.
    • डोसे घालताना तवा निर्लेपचा असला तरी डोसा वाटीला अथवा डावाला चिकटतो. म्हणून डोसे करताना तवा व्यवस्थित तापल्यावर खाली उतरवावा. स्वच्छ फडक्याने पुसावा. त्यानंतर त्यावर डोसा घालून गॅसवर ठेवावा. डोशावर तेल घालावे. तव्याला लावू नये. तवा खाली घेतल्याने आणि पुसल्याने तवा किंचित गार होतो, त्यामुळे डोसा बनवण्याची प्रक्रिया लगेच सुरू होत नाही आणि तव्याला तेल न लावल्याने डोसा चिकटत नाही.

    हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी…

    • कधीतरी रात्री केलेली मुगाची खिचडी उरते. परत सकाळी खायला सर्वांनाच आवडते असे नाही. तेव्हा कुकरमध्ये परत एकदा ठेवून ती जरा जास्त शिजवून घ्यावी. गार झाल्यावर ती हाताने स्मॅश करावी. त्यात मिरच्या कापून, कोथिंबीर, एखादा बारीक कांदा चिरून आणि एखादा उकडलेला बटाटा बारीक कुस्करून घालावा. बटाटे पराठे करतो त्याप्रमाणे हे सारण भरून पराठे करावेत. अतिशय पौष्टिक आणि रुचकर पराठा लागतो.
    • केक करताना मैदा, बेकिंग पावडर एकत्र करून तीन वेळा चाळा. त्यासाठी जमिनीवर वर्तमानपत्राचा कागद अंथरा, कागदापासून अंदाजे दोन-अडीच फूट वर चाळणी धरून हळूहळू चाळा. यामुळे पिठात हवा मिसळते आणि केक चांगला फुगून हलकाही होतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी…

    • बाजारात मिळतात तसे तिखटमिठाचे मसाला दाणे घरी बनवायला अत्यंत सोपे आणि स्वस्त पडते. साध्या चणाडाळीच्या कोरड्या पिठात तिखट, मीठ, हळद, धणे- जिरे पावडर, ओवा घालावा, नंतर कच्चे शेंगदाणे साधारण भिजतील एवढेच पाणी त्याला लावावे. नंतर तयार केलेले कोरडे डाळीचे पीठ दाण्यांना चोळावे आणि भज्यांप्रमाणे तेलात तळावेत. अत्यंत रुचकर आणि कुरकुरीत दाणे तयार होतात.
    • तिखटमिठाच्या पुऱ्यांची कणीक टोमॅटोच्या रसात भिजवावी. त्याला वेगळी चव येते.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn