Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : स्वादिष्ट केक, घरगुती चॉकलेट्स अन्…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : स्वादिष्ट केक, घरगुती चॉकलेट्स अन्…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 28, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, स्वादिष्ट केक, घरगुती केक, खमंग चकली, घरगुती चॉकलेट्स,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये स्वादिष्ट केक, घरगुती चॉकलेट्स अन् खमंग चकली बनविण्याच्या टिप्स पाहुयात.

    • चार चांगले पिकलेले टोमॅटो, दोन वाट्या डाळीचे पीठ, एक वाटी तांदळाचे पीठ, मीठ, तिखट, धणेपूड, जिरेपूड, कोथिंबीर, मीठ, तेल हे सर्व साहित्य मिसळून घ्यावे. हे मिश्रण सरसरीत भिजवावे आणि तासभर झाकून ठेवावे. नंतर गॅसवर पसरट तवा ठेवून ते मिश्रण पळीने नीट तव्यावर टाकावे आणि पातळ पसरावे. दोन मिनिटे झाकून ठेवावे. वाफ आल्यावर उतरवावे. तिखट चटणीबरोबर हा पदार्थ रुचकर लागतो.
    • बहुतेक प्रकारच्या चकल्या करताना तांदूळ वापरला जातो. सर्व धान्ये धुतली नाहीत तरी तांदूळ धुऊन वाळवावेत आणि नंतर सर्व धान्ये एकत्र दळावीत. तांदूळ धुऊन एक तास पाण्यात भिजत ठेवावेत आणि या पाण्यात तुरटी फिरवावी. नंतर तांदूळ निथळून, वाळवून दळावेत. अशा प्रकारे केलेली चकली अतिशय हलकी होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी…

    • दर वेळेस विकतची चॉकलेट आणण्याऐवजी हे सोपं चॉकलेट घरी बनवून बघा. पाव किलो टोमॅटोचा मिक्सरवर रस काढून गाळून घ्यावा. रसापेक्षा थोडी कमी साखर घालून मंद गॅसवर आटवावे. खवा असल्यास थोडा खवा अथवा आटत आल्यावर थोडीशीच पिठीसाखर घालून चॉकलेट-गोळ्यांचे आकार द्यावेत. टोमॅटोच्या रंगामुळे अगदी चॉकलेटसारखी दिसणारी आणि किंचित आंबटगोड चॉकलेटं तयार होतात. पाव किलो टोमॅटोची पंधरा-वीस चॉकलेटं होतात. कुठलाही कृत्रिम रंग वा स्वाद लागत नाही.
    • केकसाठी आयसिंग करताना जर आयसिंग जास्त पातळ झाले, तर नक्षी चांगली येत नाही. त्यासाठी आयसिंगमध्ये थोडे कॉर्नफ्लोअर मिसळावे किंवा घरच्या घरी आयसिंग शुगर तयार करावी. ती अगदी कमी वेळात आणि अल्प किमतीत तयार होते. पाव किलो पिठीसाखरेत, (पिठीसाखर घरी मिक्सरमध्ये करावी. बाजारच्या पिठीसारखेत खूप कचरा असतो.) साधारण एक ते सव्वा टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालून पिठीच्या चाळणीने 3 ते 4 वेळा चाळावे म्हणजे मिश्रण चांगले एकजीव होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा

    • केकच्या मिश्रणात अंड्यातील पिवळा आणि पांढरा भाग एकत्र न घालता पांढरा भाग शेवटी घालावा. हे मिश्रण निर्लेप सॉस पॅनमध्ये घालून गॅसवर ठेवावे. पॅनखाली पोळीचा सपाट तवा ठेवावा. गॅस मंद ठेवा. एक तासाने केक छान फुलून येतो. निर्लेप पॅनमुळे केक चिकटत नाही. शिवाय भांड्याला तूपही फारसे लावावे लागत नाही.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn