Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : कामाचे नियोजन आणि पूर्तता
    आरोग्य

    निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : कामाचे नियोजन आणि पूर्तता

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेNovember 22, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, निरामय आरोग्य, कामाचे नियोजन, दैनंदिन कार्य, ऑफिस काम, कार्यालयीन काम, गृहिणींचे घरकाम, शालेय अभ्यास,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखांमधून आपण रोज ठराविक वेळेस करावयाच्या दिनचर्येतील विविध बाबींची सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण दिनचर्येतील कामाचे नियोजन आणि पूर्तता या महत्त्वाच्या विषयासंबंधी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी, आपण कामाचे स्वरुपाबाबत माहिती घेऊयात.

    कामाचे स्वरुप

    व्यक्तीच्या कामाचे स्वरुप वयोमानानुसार वेगवेगळे असते.

    • किशोरवयीन विद्यार्थी/ विद्यार्थीनी – शिक्षण, अभ्यास, परीक्षा, स्पर्धा आणि खेळ इत्यादी.
    • मध्यमवयीन आणि प्रौढ पुरुष/ महिला – नोकरी/ व्यवसाय संबंधित कामे, घरकाम तसेच बाहेरची कामे इत्यादी.
    • ज्येष्ठ पुरुष / महिला – व्यवसाय अथवा उपजिविकेसंबंधित कामे तसेच घरातील आणि बाहेरची कामे इत्यादी.

    हेही वाचा – Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज

    कामाचे नियोजन

    व्यक्तीच्या कामाच्या स्वरूपानुसार समर्पक नियोजन करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन सर्वसाधारणपणे कामाचे नियोजन खालील पद्धतीने करणे यथार्थ होईल.

    • दुसर्‍या दिवशीच्या कामाचे नियोजन आदले दिवशी रात्री 9 ते 9.30च्या दरम्यान करावे. असे केल्यास सकाळची घाई गडबड टाळता येईल आणि दिवसाची सुरुवात शांत तसेच प्रसन्न मनाने होईल.
    • सकाळी उठल्यावर थोडा वेळ चिंतनासाठी अवश्य व्यतीत करावा.
    • नियमित योगाभ्यास अथवा सोईस्कर शारीरिक व्यायाम झाल्यावर दैनंदिन कामाची उजळणी करावी.
    • आठवड्याचे कामाचे नियोजन सुट्टीच्या दिवशी करावे. तसेच सुट्टीच्या दिवशी इतर कामे उरकून पुरेशी विश्रांती घ्यावी, म्हणजे आठवड्याची सुरुवात उत्साहात होईल.

    कामाचे नियोजन आणि पूर्ततेविषयी काही महत्त्वाचे मुद्दे

    कामाचे नियोजन जर योग्य पद्धतीने केले तर कामाची पूर्तता देखील नक्कीच सुरळीत आणि व्यवस्थित होईल.

    • विद्यार्थ्यांनी परीक्षा, स्पर्धा तसेच शैक्षणिक उपक्रम ध्यानात घेऊन अभ्यासाचे दैनंदिन वेळापत्रक बनवावे आणि त्याचे काटेकोर पालन करावे.
    • गृहिणींनी घरकाम आणि स्वयंपाक तसेच महिला आणि पुरुष यांनी घरातील कामे, स्वच्छता यासंदर्भात योग्य नियोजन करून व्यवस्थित पूर्तता करावी.
    • नोकरी-व्यवसाय तथा कामासाठी जाण्यापूर्वी पुरेसा आणि पौष्टिक नाश्ता करावा, म्हणजे  कामाचा उत्साह वाढेल आणि कामाची पूर्तता वेळेवर तसेच योग्य पद्धतीने होईल.
    • काम बैठ्या स्वरुपाचे असल्यास अधूनमधून शारीरिक हालचाली कराव्यात म्हणजे शारीरिक तक्रारी उद्भवणार नाहीत आणि काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी सहाय्य मिळेल.
    • कामाच्या ठिकाणी एसीचा वापर करायचा असेल तर, वातावरणानुसार एसीचे तपमान ठेवावे.
    • घरून काम करण्याची ऑनलाइन पद्धत असेल वैयक्तिक दिनचर्या पाळण्यासाठी अवश्य प्रयत्न करावेत.

    हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…

    तात्पर्य, दिनचर्येतील ठराविक अथवा सोईस्कर वेळी कामाचे सुनियोजन केले तर, वेळेनुसार शिस्तबद्ध पूर्तता निश्चित होईल.

    सर्वपरिचित इंग्रजी उक्तीनुसार – Plan the work and work the plan.

    या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ या पुस्तकात ‘आरोग्यदायी विहार’ या विषयावर सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शन केले आहे. तसेच ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकात ‘निसर्गसुसंगत दिनचर्या’ या विषयावर उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

    क्रमशः

    Author

    • रविंद्र परांजपे
      रविंद्र परांजपे
    रविंद्र परांजपे

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn