Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»शैक्षणिक»बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटासाठी मुक्त व्यवसाय
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटासाठी मुक्त व्यवसाय

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेNovember 17, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, शाळाप्रवेश, बालगट अभ्यासक्रम, मुक्त व्यवसाय, फाडकाम, चुरगळा काम, माती काम, मुलांची चित्रकला,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील दोन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील मुक्त व्यवसाय या विषयाची खेळगट आणि शिशुगट या वर्गांसंबंधित सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटाशी निगडित मुक्त व्यवसाय या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. बालगटातील मुलं थोडी मोठी झालेली असतात. शिशुगटाचा अनुभव असल्याने बालगटातील मुलं मुक्त व्यवसाय सफाईने करू शकतात.

    आता आपण मुक्त व्यवसायातील विविध उपक्रमांबद्दल माहिती घेऊ.

    फाडकाम

    रंगीत पतंगाच्या कागदांचे फाडकाम मुलं व्यवस्थितपणे करतात. यामुळे मुलांच्या हस्त लेखन कौशल्यास हातभार लागतो.

    चुरगाळाकाम

    फाडलेल्या कागदांचे तुकडे दिल्यास मुलं चुरगाळे अधिक चांगल्या पद्धतीने बनवतात. त्यांनी बनवलेले चुरगाळे छान बारीक तसेच घट्ट होतात.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : मुक्त व्यवसाय

    चिकटकाम

    मुलांना कागदाचे रंगीत तुकडे दिल्यास मुलं तुकडे व्यवसाय वहीवर आकर्षक पद्धतीने चिकटवतात.

    मणी ओवणे

    मुलं शिशुगटात वेगवेगळ्या रंगांचे मणी वायरमधे ओवायला शिकलेली असतात. आता मुलांना रंगसंगती साधून मणी ओवण्यासाठी प्रेरित करावे. यासाठी रंगसंगती साधलेल्या मण्यांच्या माळा वर्गात टांगून ठेवाव्यात. मुलं निरीक्षणातून रंगसंगती साधून मणी ओवतात. मणी ओवताना मुलांचे निरीक्षण शिक्षिकेने अवश्य करावे. यातूनच कोणत्या मुलांना चित्रकलेची उपजतच समज आणि आवड असल्याचे लक्षात येते.

    फुले ओवणे

    प्लास्टिकची रंगीबेरंगी फुले मुलं आवडीने ओवतात. मुलांना ओवायला दिलेले मणी आकाराने मोठे असतात तर, फुले तुलनेने लहान आकाराची असतात. मण्यांनंतर मुलांना फुले ओवायला दिली जातात. असे करताना ‘स्थूलातून सूक्ष्माकडे’ या तत्त्वाचा अवलंब होतो. किंबहुना, बालशाळेत मुलांकडून विविध कृती करून घेताना याच तत्त्वाचा अवलंब केला जातो. फुले ओवायला देताना सुरुवातीला मोठ्या आकाराची आणि नंतर लहान आकाराची फुले दिली जातात. या उपक्रमामुळे मुलांचे डोळे, हात आणि मेंदू यांचा समन्वय अधिकाधिक चांगल्या पद्धतीने होतो.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटासाठी मुक्त व्यवसाय

    मातीकाम

    मातीकाम करण्याची मुलांना शिशुगटात सवय झालेली असते. बालगटातील मुले मातीकाम करताना निरनिराळ्या आकाराच्या वस्तू बनवतात. काही वस्तू शिक्षिकेने मुलांच्यासमोर तयार करून ठेवाव्यात. उदाहरणार्थ, चेंडू, बॅट, पोळपाट-लाटणं, टोपी, वेणी इत्यादी. सोप्या वस्तू करत असताना मुलं तुलनेने अवघड वस्तू करायला शिकतात.

    मातीकामामुळे हातांच्या बोटांना चांगला व्यायाम मिळतो तसेच एकाग्रता साधली जाते. याआधी सांगितल्यानुसार मातीकामामुळे अंगातील उष्णता कमी होते. तसेच मातीकाम झाल्यावर मुलं हात व्यवस्थित स्वच्छ करत आहेत, याची दक्षता सेविका आणि शिक्षिका यांनी अवश्य घ्यावी.

    मनोरे लावणे

    मुलांना मनोरे लावताना वेगवेगळे रंग आणि गोल, चौकोनी असे विविध आकार माहीत होतात. एकाच मनोऱ्यातील ठोकळे वेगवेगळ्या रंगाचे असतात. यातूनच मुलं पुढे विज्ञानातील गुलाबी मनोरा लावायला शिकतात. हा गुलाबी मनोरा तयार करताना दहा ठोकळे आकारानुसार क्रमाने लावले जातात, म्हणजे मोठ्या आकाराचा ठोकळा सर्वात खाली, त्यावर त्याहून थोड्या लहान आकाराचा ठोकळा आणि या पद्धतीने सर्वात लहान ठोकळा सर्वात वर, अशा रितीने मनोरा रचला जातो. सर्व ठोकळ्यांचा रंग मात्र गुलाबीच असतो.

    बंगला पेटी उपक्रम

    बालगटातील मुक्त व्यवसायात बंगला पेटीचा समावेश होतो. यात गोल, चौकोनी, त्रिकोणी, लंबगोल अशा आकाराचे रंगीबेरंगी ठोकळे असतात. या ठोकळ्यांचा योग्य पद्धतीने वापर करून मुलं वेगवेगळ्या कलाकृती तयार करतात. उदाहरणार्थ घर, बोगदा, पूल इत्यादी. अशा उपक्रमातून मुलांची कल्पकता विकसित होते.

    चित्रकला

    मुक्त व्यवसाय अंतर्गत फळ्यावर रेघोट्या मारणारी मुलं रेघा-गोलातून चित्रं काढायला शिकतात. स्वयंप्रेरणेतून हे साध्य होते.

    मुक्त व्यवसायातून बालगटातील मुलांच्या विशेष कौशल्याचा विकास होण्यास सुरुवात होते. पुढील लेखात आपण अभ्यासक्रमातील हस्तव्यवसाय या विषयाबाबत जाणून घेणार आहोत.

    क्रमश:

    Author

    • रश्मी परांजपे
      रश्मी परांजपे
    रश्मी परांजपे

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn