Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : खमंग मोठी इडली अन् चविष्ट भातवडा…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : खमंग मोठी इडली अन् चविष्ट भातवडा…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 16, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मोठी इडली अन् चविष्ट भातवडा, खुसखुशीत चकल्या
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये डोसा किंवा इडलीचे पीठ उरले तर काय करायचे? तसेच शिळ्या भाताचे काय करायचे, याच्या काही टीप्स पाहूयात –

    • डोसा किंवा इडलीचे वाटलेले पीठ थोडे उरले असेल तर त्यात थोडे हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, मीठ, जिरे मिक्स करावे. नंतर गॅसवर एका कढईत थोडे तेल तापवून त्यात वरील मिश्रण घालावे आणि वर झाकण ठेवावे. पाच ते सहा मिनिटांनंतर झाकण काढून मिश्रण उलटे करावे आणि परत झाकण ठेवून 1 मिनिट होऊ द्यावे. नंतर लोणच्याबरोबर ही मोठी इडली गरम गरम खावी. फार छान लागते.
    • एखाद्या वेळेस हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात आणल्या गेल्यास किंवा उरल्यास कोथिंबिरीचा जो छिद्रांकित डबा असतो त्यात किंवा एका डिशमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे. आठ-दहा दिवसांनंतर मिरच्या चांगल्या सुकतात, मात्र रंग हिरवाच राहतो. त्यात थोडे मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करावे आणि ही बारीक हिरवी मिरची पूड आयत्या वेळी चटकन वापरता येते. वास आणि स्वादही हिरव्या मिरचीचाच येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : कोथिंबीर वडी, अळुवडी आणि केक करताना….

    • साधारणपणे चकलीचे पीठ तयार करताना त्यातील मुख्य घटक – तांदूळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ 4:2:1 या प्रमाणात घेतली जातात; परंतु या परंपरागत प्रमाणापेक्षा चार वाट्या तांदळास दीड वाटी प्रत्येकी चण्याची व उडदाची डाळ घ्यावी. अशा पिठाच्या चकल्या फारच खुसखुशीत आणि हलक्या होतात. एक एक धान्य धुऊन, उपसून लगेच पाच-सात मिनिटांनी भाजायला घ्यावं. भाजत आलं आहे असं वाटलं की, एक-दोन दाणे तोंडात टाकून पाहावे. चावल्याबरोबर पटकन भुगा झाल्यास छान भाजले गेले आहे, असे समजावे आणि लगेच ताटात काढावे. धणे- जिरे कढईत न भाजता गरम डाळ-तांदळात दडपून ठेवावे. बेताचे आणि कोमट मोहन घालून आधी पिठावर थोडंसं गरम पाणी ओतून ढवळावे आणि मग गार पाण्याने मळावे.

    हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग

    • आपल्याकडे बऱ्याच वेळा भात उरतो. कांदा, दाणे घालून अगर नुसता फोडणीचा भात करण्यात येतो. भातवड्याला शिळा भात लागतो. कारण तो कोरडा असतो. असा शिळा भात मोकळा करून, त्यात बेताचे डाळीचे पीठ आणि प्रमाणशीर दाण्याचे कूट, तसेच योग्य प्रमाणात तिखट, मीठ आणि हळद घालावी. थोडे पाणी टाकून त्याचा गोळा तयार करावा. साबुदाण्याचे वडे करतो, त्या आकाराचे वडे करून, तव्यावर थोड्या तेलात खरपूस परतावेत. तेलाची बचत तर होतेच, पण सर्वांत कमी खर्चाचा, खमंग, चविष्ट आणि रुचकर पदार्थ तयार होतो. हे वडे तेलकट लागत नाहीत. या भातवड्याबरोबर कोणत्याही चटणीची जरुरी भासत नाही.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn