Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»केतनचा वाढदिवस… भैरवी!
    ललित

    केतनचा वाढदिवस… भैरवी!

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 13, 2025Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, डॉक्टर नेने, डॉक्टर नाडकर्णी, किशोरीताईंची भैरवी, भैरवी, केतनचा वाढदिवस,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नितीन फलटणकर

    छान मंद आवाजामध्ये किशोरीताईंचा ‘या पंढरीचे सूख पहाता डोळा, उभा तो जिव्हाळा योगीयांचा…’ हा अभंग सुरू होता. मंदाताई खुर्चीवर बसून अभंग ऐकत होत्या. सका‌ळचे 6 वाजले होते. चिमणरावांच्या समोरच्या बागेत गुळण्या सुरू होत्या. छोटंसं पण टुमदार असं ते घर. घरासमोर मोठी बाग. मंदाताईंना आवडतात म्हणून बागेत बटनरोजपासून मोगऱ्यापर्यंतची झाडं. रात्री पाऊस झाल्याने रातराणीच्या फुलांचा हलकासा चट् चट् असा गोंधळ चाललेला.  बागेला तारांचं छानसं कुंपण. घरात प्रवेश करताना मोठा व्हरांडा. येणाऱ्याच्या उजव्या बाजूला केनचे सोफे. डाव्या बाजूला वाऱ्याने एकटाच झुलणारा झोपाळा. त्याचा कुंई… कुंईं… असा आवाज. आजू-बाजूला असलेल्या सिमेंटच्या जंगलात हे एकमेव टुमदार घर, कॉलनीत वेगळी ओळख टिकवून होतं. गावाकडचा फिल येण्यासाठी चिमणरावांनी घराला कौलारू केलं होतं. 

    चिमणरावांच्या गुळण्या झाल्या तसे ते आत आले. तोंडावरून टॉवेल फिरवला. तितक्यात मंदाताईंनी टेबलावर चहा अन् खारी आणून ठेवली होती. चिमणरावांनी आपल्या कवळ्या शाधण्यासाठी म्हणून डोळ्यांवर चष्मा चढवला. आज गोळ्यांच्या टेबलावर कवळ्यांचा डबा नव्हता. तसे ते मंदाताईंकडे वळले. मंदाताईंनी स्मितहास्य करत, टाळी वाजवत… त्यांना वाकुल्या दाखवत हातातील कवळ्यांचा डबा दाखवला. चिमणरावही मिष्किलपणे हासत टेबलाजवळ गेले.

    टेपचा आवाज त्यांनी जरासा मोठा केला. आता त्यावर किशोरीताईंचा ‘जनी म्हणे पांडुरंगा, माझ्या जिवींच्या जीवलगा…’ हा अभंग लागला होता. “रोज सकाळी किशोरीताईंचे हे अभंग ऐकल्याशिवाय पहाटेची मजाच येत नाही, किनै?” मंदाताईंनी चिमणरावांकडे पाहात प्रश्न केला. त्यांनी मानेनेच होकार दिला.

    “आजचा काय बेत? केतनचा वाढदिवस ना आज?” मंदाताईंना चिमणरावांची प्रश्न केला.

    “हो तर.. आज मी छान बेत आखला आहे. त्याला आवडते म्हणून आज छान तिखटा-मिठाच्या पुऱ्या अन् गुलाबजाम करणारेय… भाजी बघू वांग्याची करावी म्हणतेय. तसाही तो घाईत असतो. आवरावं लागेल लवकर. तू एक काम कर.. पटकन समोरून भाजी घेऊन ये. तोपर्यंत मी इतर कामांचं बघते… आणि हो, आज डॉक्टर नेने येणारेत पुन्हा एकदा ब्लड आणि युरिन घ्यायला… सध्या जाम चिडलेत हां ते तुझ्यावर! बायपास झाल्यापासून तू तब्येतीकडे फार दुर्लक्ष करतोय, असे म्हणत होते मला काल फोनवर…” बोलणं संपवून मंदाताई किचनकडे वळल्या.

    मोठ्या खिडक्या असल्याने किचनमध्ये भरपूर हवा येत होती. मंदाताईंच्या मागे जात चिमणरावांनी त्यांना शाल पांघरली… “काय कळतेय त्या नेन्याला. काहीतरी सांगून तुझं नुसतं टेन्शन वाढवायचं असतं त्याला. त्याला म्हणाव आपण दोघेही डॉक्टर आहोत. हे विसरू नको अन् नको ते सल्ले देऊ नकोस! तुला सांगतो… तुला पटवता आली नाही ना म्हणून माझ्याबद्दल काहीतरी सांगत असतो तो तुझ्याकडे…” चिमणराव मंदाताईंकडे बघून म्हणाले. तशा त्या लाजल्या, “मी बरी त्याला पटेल तू असताना? तू काय कमी प्रयत्न केले होतेस? पण खरं सांगू, तू जर मला त्या दिवशी जास्वंदीची फुलं आणून दिली नसतीस ना, तर मी तुलाही हो म्हणाले नसते… मुलाचं नाव चिमणराव ऐकूनच कुणीही नकार दिला असता…” दोघेही जुन्या आठवणीत रमले.

    हेही वाचा – कन्फेशन कॉल…

    “जो मुलगा एखाद्या तरुण मुलीला जास्वंदीची फुलं आणून देतो, तो किती वेंधळा असेल? त्याला जर कुणी सांभाळले नाही तर, त्याचे काय होईल या विचारानेच मी तुला हो म्हणाले…” मंदाताई पुन्हा एकदा गोड लाजल्या.

    “हो… हो… सारखं ते फुलांचं उदाहरण द्यायला नको. मी काही वेंधळा वगैरै नव्हतो. काहीच दिसलं नाही अन् नेन्याने मला चॅलेंज केलं होतं, म्हणून घाईघाईत आईच्या पूजेच्या परडीतून मी ती फुलं उचलून आणली होती…” थोड्या लडीवाळ आवाजात चिमणराव म्हणाले.

    “बरं, जातोय मी भाजी आणायला,” असं म्हणत चिमणराव बाहेर पडले. पिशवी घरातच बघून मंदाताई त्यांच्यामागे धावल्या खऱ्या पण, तोपर्यंत चिमणरावांनी कुंपण ओलांडलं होतं. “वेडा चिमण्या…” असं पुटपुटत त्या तशाच किचनमध्ये आल्या. इतक्यात फोनची रिंग वाजली. त्यांनी फोन उचलला. “हॅलो…” तिकडून आवाज आला, “आहे का गं चिमण्या घरी? येऊ का मी?” मंदाताई एकदम म्हणाल्या, “नेन्या त्याला चिमण्या म्हणू नको… तो भाजी आणायला गेलाय… आणि हो येताना गुलाबजाम घेऊन ये… आज केतनचा वाढदिवस आहे…” डॉ. नेने एकदम शांत झाले… “आणतो बाई म्हणत,”  त्यांनी मोठा उसासा सोडला. इतक्यात मंदाताई म्हणाल्या, “ऐक. तू जरा दुपारी ये, आज इथेच जेवण कर…” नेनेंनी, ‘दुपारी 2 वाजता येतो,’ असे सांगत फोन ठेवला.

    इतक्यात सदऱ्यात वांगी घेऊन चिमणराव घरी परतले. “आज पुन्हा पिशवी विसरलो…” म्हणत त्यांनी किचनच्या ओट्यावर वांगी ओतली आणि मंदाताईंना प्रश्न केला, “आला होता का त्या नेन्याचा फोन?” मंदाताई हसल्या… “भाजी आणायला गेला होतात की, घराबाहेरूनच माझ्यावर नजर ठेऊन होतात?”

    हेही वाचा – निखळ मैत्रीचा ‘दीप’

    पाहता पाहता सकाळचे 11 वाजले होते. चिमणरावांनी देवपूजा आटोपून घेतली. मंदाताईंनीही आंघोळ करून पूर्ण स्वयंपाक केला. किचनमधून तो बाहेर आणून हॉलमधल्या तसबिरीखालच्या टेबलावर ठेवला. गुलाबजाम वगळता ताटात सारे काही होते…! एका बाजूला मीठ, दह्यात भिजवलेली चटणी, वाटीभर भात त्यावर साधं वरण अन् या दोघांना एकसंध करणारी तुपाची चंद्रकोर, जवळच त्यात उडी मारायला आतूर असलेली लिंबाची फोड… वाटीत डोळे मोठे करून पहाणारी वांग्याची तर्री आलेली भाजी, ओळीने ताटात शिस्तीत बसलेल्या चार पुऱ्या आणि थोडी साखर… ते ताट टेबलावर पाहिल्यावर चिमणराव म्हणाले, “अगं, आधी देवाला दाखव मगच केतनला दे…”

    “असू द्या हो! मुलं देवाघरचीच फुलं… काही होत नाही. नाही रागावणार तुमचा देव…”

    “चिमणरावांनी मंदाताईंचा हात धरला… थोडावेळ बसू या का इथे? या पलंगावर… केतनचा आवडता पलंग हा…” दोघेही हसले. मंदाताईंना त्यांनी पलंगावर भिंतीला टेकून बसवले.  चिमणराव खाली त्यांच्या पायाशी बसले आणि म्हणाले, “जरा मालिश कर ना डोक्याची…”

    अभंग संपून आता किशोरीताईंची भैरवी ‘बाबुल मोरा नैहर छुटोही जाए…’ लागली होती. 5 मिनिटे झाली असतील… दारातून कुणीतरी आत आले. हातात गुलाबजामचा डबा होता… डोक्यावर बर्थ डे कॅप, तोंडाने जोरात पुंगी वाजवत ‘हॅप्पी बर्थ डे टू यू…’ असं गात नेने आत आले…. मागे भैरवीचा स्वर अधिक गंभीर झाला होता… नेने घाबरले… त्यांनी आपल्या बॅगेतून स्टेथो काढला… दोघांनाही तपासले… दोघांचीही कोणतीही हालचाल होत नव्हती… चिमणराव तसेच बसून होते. त्यांची मान खाली झुकली होती तर मंदाताईंचे डोळे सताड उघडे… छताकडे लागलेले. टेबलावर केतनच्या तसबिरीखाली एक ताट ठेवलेलं… चिमणरावांच्या हातात एक जुने, पाच वर्षांपूर्वीचे वर्तमानपत्र होते… डॉ. नेनेंनी ते काढून पाहिले. हेडलाइन होती…. ‘ट्रक-कार अपघातात प्रसिद्ध डॉ. चिमणराव नाडकर्णी यांचा तरुण मुलगा ठार…’ 13 मिनिटांची भैरवी संपली होती… गुलाबजाम जमिनीवर पडलेले…

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn