Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 29, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक, उकड पेंड, बिस्किटांचे वडे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात –

    • घरात नेहमी पोहे, रवा असेलच असे नाही; परंतु गव्हाची कणीक मात्र नेहमी असतेच. ऐनवेळी कोणी आले तर, खायला काय करायचे, असा मोठा प्रश्न समोर उभा ठाकतो. अशा वेळी घरातील कणीक उपयोगाला येते. चार वाट्या कणीक घेऊन त्यात मीठ, तेलाचे मोहन घालावे आणि थोडेसे ताक घालून सैलसर कणीक भिजवावी. कढईत तेल तापवून हिंग, मोहरी टाकून फोडणी करावी आणि त्यात मोठ-मोठे चिरलेले कांदे घालून चांगले परतून घ्यावेत. एक वाफ आल्यावर भिजवलेली कणीक घालून पीठ मोकळे होईपर्यंत चांगले परतत राहावे. वरून खोबरे आणि कोथिंबीर पेरून खायला द्यावे. मुलांनाही उकडपेंड खूप आवडते आणि पौष्टिकही आहे.

    हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी…

    • बिस्किटांचे शिल्लक तुकडे आणि पावसाळ्यामुळे मऊ झालेली बिस्किटांचे काय करायचे? एक वाटी खाऱ्या बिस्किटांचा (ब्रिटानिया टॉप किंवा मोनॅको) चुरा, पाव वाटीपेक्षा जरा जास्त कणीक, मिठाचे प्रमाण जरा कमी घ्यावे, कारण बिस्किटे खारी असल्यामुळे मीठ कमी लागते. बारीक वाटलेल्या दोन-तीन ओल्या मिरच्या आणि कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, दोन टीस्पून तेल हे सर्व एकत्र करावे. कढईत तेल तापत ठेवावे. वडे थापून त्यावर थोडे थोडे तीळ पसरा आणि तळून काढा. बिस्किटे बेक्ड असल्यामुळे जास्त तळावेही लागत नाही. बिस्किटांचा चुराही वाया जात नाही.
    • चार वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ अशा प्रमाणात वाटून आपण डोसे करतो, डाळ, तांदूळ बारीक वाटताना, त्यात एक मध्यम आकाराचा कांदा वाटून घातल्यास डोसे कुरकुरीत तर होतातच, शिवाय त्याला तकाकी येऊन डोसा न चिकटता, पटकन सुटून गुंडाळी करता येते.

    हेही वाचा – Kitchen Tips : दहीवडा, सँडविचची चटणी अन् रगडा पॅटीस बनवताना हे करून पाहा

    • कधी कधी केक फार कोरडा होतो. अशा वेळी तो खोलगट बाऊलमध्ये ठेवून त्यावर साखरेचा पाक घालावा. साखरेचा पाक, फळांचे बारीक तुकडे आणि त्यावर आइस्क्रीम वाढल्यास छान लागतो.
    • व्हेजिटेबल कटलेट करताना मिश्रणात लिंबू रस घालण्याऐवजी चिमूटभर सायट्रिक ॲसिड घालावे म्हणजे मिश्रण सैल होणार नाही.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn