Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अवांतर»चेन्नई ते पुणे विमानप्रवास अन् तो तरुण…
    अवांतर

    चेन्नई ते पुणे विमानप्रवास अन् तो तरुण…

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 27, 2025Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, झारखंड तरुण, नोकरीची गरज, चेन्नई पुणे प्रवास, विमानप्रवास, नोकरीची वणवण
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    जवळपास चार एक महिन्यांपूर्वीची ही गोष्ट असेल. ऑफिसच्या कामासाठी हल्ली खूप फिरावं लागतं. बऱ्याच वेळा मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी, तर कधी मुंबईबाहेर सुद्धा! अशीच एक चेन्नईची भेट संपवून पुण्याला जायला निघालो होतो. दुपारी साडेतीनचं उड्डाण होतं आणि त्याच्या दोन तास आधी तरी विमानतळावर पोहोचायचं होतं. उशिराच्या विमानांची तिकिटं उपलब्ध नव्हती, त्यामुळे हे लवकरचं विमान!

    सकाळी पटापटा कामं उरकली आणि साधारण दुपारी एकच्या सुमारास मी आणि माझा सहकारी विमानतळावर पोहोचलो. सकाळी मस्त इडली, डोसे, पायसम वगैरे भरपेट न्याहारी केल्यामुळे भूक फारशी नव्हती. तरीही, चेन्नईतल्या नावाजलेल्या ‘अडयार आनंद भवन’ हॉटेलमधून सांबार-भात बांधून आणला होता, त्याचा फन्ना उडवला.

    सहकारी मुंबईच्या विमानाकडे वळला आणि मी पुण्याच्या… आता एकटाच होतो आणि बराच वेळ हाताशी होता. राजन खान यांचा ‘जिरायत‘ नावाचा अप्रतिम कथासंग्रह सोबत आणला होता, त्यात रमलो… दोन कथा वाचून झाल्या आणि तेवढ्यात सात-आठ तरुणांचा एक गट माझ्यासमोर येऊन बसला. विशी-पंचविशीतले काळेसावळे तरुण, सारख्या गणवेशातले… थोडेसे उत्सुक, विस्फारल्या नजरांनी इकडे-तिकडे बघत असलेले. चकचकाट आणि एकंदर वातावरण, यामुळे थोडेसे बुजलेले…

    बहुदा पहिल्यांदाच विमान प्रवास करत असावेत, याचा अंदाज येत होता त्यांच्याकडे बघून. दिसायला स्थानिक वाटत होते, पण त्यांच्या हिंदीत गप्पा सुरू होत्या! चेन्नईत हिंदी, तेही तिथल्या स्थानिक प्रजेकडून म्हणजे अगदी अशक्यप्राय गोष्ट, याचा अंदाज मला एक रात्र आणि अर्धा दिवस,  त्या शहरात घालवल्यानंतर आला होता आणि खूप आश्चर्य वाटत होतं.

    एक जण जरा वयाने मोठा, त्यांचा म्होरक्या होता. त्यांचं सर्वानुमते ठरलं की, ‘चला चहा घेऊया!’ सगळे जण सामान वागवत जाण्यापेक्षा, दोघांनी जाऊन चहाचे कप घेऊन यावे, असं ठरलं त्यांचं आणि दोन जण गेले मोहिमेवर… येताना, उतरलेल्या चेहेऱ्यांनी, हात हलवत परत आलेले बघून बाकीचे वैतागले. चहा आणायला गेलेल्यांपैकी एक जण म्हणाला, “सालो, चाय ढाईसौ रुपये गिलास है, पिओगे?” हादरलेल्या सगळ्यांनी, एका सुरात ‘नाही, नाही…’ची घोषणा केली आणि तो विषय तिथेच संपला, चहाशिवाय!

    आम्ही सगळे विमानात चढलो आणि त्यातला एक जण नेमका माझ्या शेजारी आला बसायला. सगळे स्थिरस्थावर झाल्यावर, ‘कुर्सी की पेटी’ बांधायची सूचना आली. साधं ‘बक्कल’ ते, त्याला ‘पेटी’ का म्हणतात? हे मला आजवर न उलगडलेलं कोडं आहे. माझ्या बाजूचा मुलगा ती पेटी बांधायची झटापट करत होता आणि जसं ते कित्येक लोकांना उलगडत नाही, तसं ते त्यालाही नव्हतं झेपत… थोडी मदत केली मी आणि पेटी बसली जागच्या जागी.

    हेही वाचा – मन तृप्त करणारं… रथीनम!

    हवाई सुंदरीची सुरक्षा प्रात्यक्षिकं झाली आणि विमान धावपट्टीवर घरंगळायला लागलं. माझ्या शेजारच्या मुलाच्या चेहेऱ्यावर अतीव उत्सुकता दिसत होती. मी खिडकीजवळ आणि तो मधल्या आसनावर होता. मान वाकडी कर-करून तो हा पहिलावहिला अनुभव नजरेत साठवून घेत होता. विमान आकाशस्थ झालं आणि सगळे सैलावले. आता जवळजवळ दीड तासांची निश्चिती होती.

    माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी त्या मुलाशी संवाद साधायला सुरुवात केली. जेमतेम बावीस वर्षांचा तो मुलगा,  झारखंडचा निवासी. मला त्या सगळ्यांच्या हिंदी बोलण्याचा क्षणार्धात उलगडा झाला आणि आमच्या संभाषणाची गाडी सुरू झाली, भरधाव! बी.कॉम. शिकलेला तो, झारखंडमधल्या एका छोट्याशा आदिवासी गावातून चेन्नईत अवतरला होता, नोकरी करायला! कुठे झारखंड, कुठे चेन्नई, दोन टोकं… लगोलग त्याने मला त्याच्या कंपनीचं ओळखपत्र दाखवलं आणि म्हणाला, इस कंपनी में जॉब लगा है, सर. हमारी कंपनी कार के पार्ट्स और गियर बॉक्स बनाती हैं. त्याचं खातं ‘Quality Control ‘ असं लिहिलं होतं, त्याच्या कार्डावर!?

    मनात विचार आला बीकॉम मुलगा आणि QC चं काम कसं करणार? त्याला विचारल्यावर तो म्हणाला, “जॉब मिलना आवश्यक था, सो जो मिल गया,  वही थाम लिया.” मी मान डोलावली. जीवनाचं सार होतं त्या उत्तरात!

    घरी शेती करणारे वडील, आई आणि धाकटा भाऊ. दहा-बारा एकरांचं वावर. गहू, तांदूळ, भाज्या, कडधान्य असं सगळं पिकवतो म्हणाला. पाणी भरपूर आहे, सरकारने बोरिंग घ्यायला मदत केलीय. तो सुटला होता नुसता… बऱ्याच दिवसांनी असा, ऐकणारा श्रोता मिळाला होता बहुतेक त्याला!

    घरी कोंबड्या, बकऱ्या आणि म्हशी आहेत. वडील कोंबडे पाळून त्यांना झुंज करायचं शिक्षण देतात आणि तसा एक कोंबडा दोन-तीन हजार रुपयांना विकला जातो. बापाबद्दलचा अभिमान ओतप्रोत भरलेला, प्रत्येक शब्दात!!

    मी विचारलं, “आता पुण्याला कशाला?”

    “चेन्नई में तीन महिना Training लिया, अब पुणे की फॅक्टरी में काम करूंगा… तिथे जाऊन मला accounts मध्ये काम देणार आहेत. माझे बाकीचे सहकारी पण BSc, ITI, Diploma झालेले आहेत. आम्ही सगळे झारखंडचे आहोत. जवळपासच्या गावांमधले आदिवासी आहोत आम्ही…”

    मला खूप कौतुक वाटलं, त्याचं आणि इतर सगळ्यांचंच. कुठल्यातरी लांबच्या राज्यातून पार परक्या प्रदेशात, एकमेकांना सोबत करून, साथ देऊन, पुढे जाऊ पाहणारी ती मुलं आवडून गेली मला एकदम.

    कंपनी राहायची आणि जेवायची सोय करणार आहे आमची. खूप पैसे वाचतील. मला शिकायचं आहे म्हणला पुढे खूप. त्याच्या निरागस डोळ्यात स्वप्नं दिसत होती मला, उद्याची.

    पुणं जवळ आलं होतं आता. मी विचारलं, इथे बसायचं आहे का खिडकीत? तयार झाला लगेच आणि आम्ही जागा बदलल्या आमच्या. विमान उडताना ज्या आनंदाला तो मुकला होता, तो आनंद शिगोशिग अनुभवला त्याने विमान उतरताना, बालसुलभ! छोट्याशा गोष्टी… पण भारावून गेला तो, पहिल्याच विमान प्रवासात त्याच्या.

    हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस

    विमानातून उतरल्यावर मला म्हणाला, थांबा सर आणि मी नाही नाही म्हणत असतानाही,  पटकन वाकून नमस्कार केला त्याने. मी नि:शब्द झालो. भरभरून आशीर्वाद दिला त्याला, माझा फोन नंबरही दिला, म्हणालो, “कधी गरज वाटली तर फोन कर. शक्य असेल ती मदत मी नक्की करेन.”

    तिथून आमच्या वाटा वेगळ्या झाल्या, बहुदा पुन्हा कधीही न भेटण्यासाठी! हा मुलगा नाव काढेल अशी चिन्ह दिसत होती. पाळण्यात दिसत होते त्याचे पाय मला! मनात विचार येऊन गेला, आपली सुखवस्तू मुलं असा संघर्ष करू शकतील का जगण्याशी?

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026 अवांतर

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर…

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026

    अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn