Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»शैक्षणिक»प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा आणि वर्ग सजावट
    शैक्षणिक

    प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा आणि वर्ग सजावट

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेOctober 20, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, School admission, शाळा प्रवेश, Post-admission, School Responsibility, शाळा सजावट, वर्ग सजावट, विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळेच्या भिंती
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखांतून आपण नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना शाळेच्या जबाबदाऱ्या या विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या शाळेतील तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसंबंधित आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता याबाबत महत्त्वाची माहिती घेतली. आता या लेखात आपण शाळेची तसेच वर्गाची सजावट याविषयी माहिती घेऊयात.

    • शाळेचे प्रवेशद्वार भक्कम आणि सुरक्षित असावे, हे आपण मागील लेखात पाहिले आहे. प्रवेशद्वार मनमोहक रंगाने रंगवलेले असावे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वार फुले व फुगे यांनी सुशोभित करावे.
    • शाळेत प्रवेश केल्यावर दिसणार्‍या भिंतीवर शाळेचे नाव सुवाच्य अक्षरात आकर्षक पद्धतीने लिहिलेले असावे.
    • मुलांचे स्वागत नेहमीच हसतमुखाने तसेच गोड शब्दांत, आवाजात करावे. आपण ‘नमस्ते’ म्हणावे आणि मुलांना देखील ‘नमस्ते’ म्हणण्यास शिकवावे.
    • वर्गाबाहेरील परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबर शक्य असल्यास भिंतीच्या कडेने छोटी रोपे लावावीत अथवा रंगीबेरंगी फुलांच्या छोट्या प्लास्टिकच्या कुंड्या, परिसर सुंदर दिसेल अशा पद्धतीने ठेवाव्यात. (मुलांच्या सुरक्षिततेची काळजी मात्र अवश्य घ्यावी.)

    हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : मुलांची सुरक्षितता

    • शाळा म्हटली की, शाळेच्या भिंती या बोलक्याच हव्यात, ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार भिंती विविध चित्रे, संदेश, सुविचार तसेच शिक्षणास समर्पक बाबींनी सुशोभित कराव्यात.
    • मुलांचा वयोगटानुसार वर्गात भिंतींच्या कडेने विविध खेळणी ठेवावीत, उदाहरणार्थ बॅट, बॉल, वेगवेगळ्या आकाराच्या छोट्या गाड्या, चौकोनी गोल मनोरे (प्लास्टिकचे अथवा लाकडी असल्यास वजनाने हलके), कोरे कागद, तेलकट खडू, पाटी पेन्सिल इत्यादी. याशिवाय शिक्षिका, मुख्याध्यापिका आपापल्या कल्पनेनुसार आणखी खेळण्यांची व्यवस्था करू शकतात.
    • वर्गाच्या दोन भिंती खालच्या बाजूस साधारण एक ते दीड फूट काळ्या रंगाने रंगविल्यास त्यांचा उपयोग फळ्यासारखा करता येतो. मुलांना त्यावर रेघोट्या मारण्यास, चित्रे काढण्यास हमखास आवडते. मुलांना शाळेत रमविण्यासाठी ही योजना नक्कीच उपयुक्त ठरते.
    • वर्गाच्या भिंतींवर विविध शैक्षणिक तक्ते, निरनिराळ्या आकाराच्या रंगीबेरंगी पताका वर्गसजावटीत खचितच भर टाकतात.
    • वर्गातील फळ्यावर सुंदर फुले, फळे, मुलांच्या आवडीची कार्टून्स अशी वेगवेगळी चित्रे काढल्यास वर्गसजावट अधिक आकर्षक दिसते.
    • वर्ग सजावट करताना बाहेरून विकत घेतलेली शैक्षणिक साधने वापरण्याऐवजी शिक्षकांनी सेविकांच्या मदतीने केलेली शैक्षणिक साधने निश्चितच आकर्षक ठरतात.
    • वर्ग चालू करताना मुलांच्या आवडीची गाणी / बालगीते लावल्यास मुलांच्या आनंदाला पारावार रहात नाही.

    हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा तसेच मुलांची स्वच्छता

    थोडक्यात, शाळेतील भिंती, परिसर आणि वर्ग सर्व काही बोलके, मुलांचे लक्ष वेधून घेणारे, मुलांना छान वाटेल आणि आवडेल असे असल्यास मुलांना शाळा नक्कीच हवीहवीशी वाटेल.

    शाळेची आणि वर्गाची सजावट मनमोहक, प्रसन्नदायक तसेच मुलांच्या शिक्षणास पूरक असावी म्हणजे मुलांच्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात खचितच सुकर होईल.

    क्रमश:

    Author

    • रश्मी परांजपे
      रश्मी परांजपे
    रश्मी परांजपे

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn