Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट अन् अलवार पोळ्यांसाठी…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट अन् अलवार पोळ्यांसाठी…

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 16, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, अलवार पोळ्या, टोमॅटो लसूण पेस्ट, टोमॅटो कांदा पेस्ट, ताजा कढीपत्ता
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स –

    • कढीपत्ता अनेक दिवस हिरवागार आणि ताजा ठेवायचा सोपा उपाय आहे. कढीपत्ता बाजारातून आणल्यावर पाने देठापासून खुडून घ्या. पानावर पाच-सहा थेंब लिंबाचा रस चोळा. कढीपत्ता प्लास्टिकच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. अनेक दिवस ताजा-हिरवागार कढीपत्ता मिळेल.
    • स्वयंपाक करताना बऱ्याच वेळा आयत्या वेळेस वेलची आणि लवंगांची पूड करण्याची वेळ येते. अशा वेळेस वेलची किंवा लवंग दमट असल्यास त्यांची पूड पटकन करणे अशक्य होते. यासाठी वेलची किंवा लवंगा एखाद्या बाटलीत अगर स्टीलच्या छोट्या डब्यात भरून फ्रीजच्या दरवाजाच्या कप्प्यात ‘तो डबा ठेवावा. त्यामुळे केव्हाही पूड हवी असल्यास पटकन तयार करता येते.
    • कणीक भिजवण्यापूर्वी अंदाजे पाणी घेऊन हवे तेवढे मोहन आणि मीठ त्या पाण्यात टाकून पाणी फेटावे. त्यानंतर त्यात कणीक घालून मळावी. पोळ्या खूप अलवार होतात. मोहन कमी लागते आणि कणीक हाताला चिकटत नाही.
    • कढीलिंबाची पाने वाळल्यावर त्यांचा स्वाद टिकत नाही. म्हणून कढीलिंब तेलावर परतून मिक्सरमधून पूड काढून ठेवावी. ती ऐनवेळी कुठल्याही पदार्थात वापरता येते.

    हेही वाचा – Kitchen Tips :  कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही

    • नारळ खराब निघाला, तर त्याचे खोबरे किसून कडक उन्हात वाळवावे. खडखडीत वाळले की, कढईत चांगले काळे होईपर्यंत भाजावे. मिक्सरमधून बारीक पूड करून ठेवावी. भरली वांगी, बटाटा, शेवग्याच्या शेंगा अशा भाज्यांत हे, खोबरे वापरा, छान चव येईल.
    • लसूण जास्त प्रमाणात हवा असल्यास गड्डा दोन्ही बाजूंनी किंचित कापून टाकावा आणि मग त्याच्या चकत्या चिरून हातावर चोळून साले फुंकून टाकली की लसूण सोलून चिरून मिनिटात तयार!
    • कांदा-लसूण सोलल्यावर हाताचा, विळी-सुरीचा वास लवकर जाण्यासाठी मीठ चोळावे, नंतर धुवावे.
    • भिजून फुगलेल्या बदामांची साले चटकन निघत नाहीत, यासाठी बदाम उकळत्या पाण्यात टाकावे व दोन-तीन मिनिटांनी बिरड्या सोलतो तसे सोलावे. साले फार चटकन निघतात आणि नंतर बदाम पाण्यात तसेच भिजत ठेवता येतात.

    हेही वाचा – Kitchen Tips : भाज्यांना दाटपणा आणणारे कूट, लसूण पावडर…

    • टोमॅटो, आले आणि लसूण मिक्सरमधून काढून ती पेस्ट शिजवावी आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यावी. भाजीत आयत्या वेळेस घातल्यास भाजी चवदार होते आणि वेळही वाचतो.
    • लसूण सोलण्यास वेळ नसेल तर, लसणीचा कांदा हातात धरून किसणीवर किसावा. खाली लसणीचा कीस पडेल आणि साले तशीच राहतील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn