Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : नवरात्री स्पेशल… साबुदाण्याची बर्फी
    फूड काॅर्नर

    Recipe : नवरात्री स्पेशल… साबुदाण्याची बर्फी

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 27, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, Recipe, रेसिपी, Navratri special, Sago barfi, नवरात्री स्पेशल, साबुदाणा बर्फी, गोड पदार्थ, Sweet dish
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    नवरात्रीच्या निमित्त ‘साबुदाणा बर्फी’ या रेसिपीची माहिती पाहुयात. साबुदाणा बर्फी हा एक पारंपरिक भारतीय मिठाईचा प्रकार आहे. यामध्ये साबुदाणा, तूप, नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा किस, साखर, दूध तसेच काजू, बदाम, पिस्ता या सुक्यामेव्यांचा उपयोग केला जातो.

    साहित्य

    • साबुदाणा – 1 वाटी
    • मलाईसह दूध – 1 कप
    • सुक्या किंवा ओल्या नारळाचा किस – अर्धी वाटी
    • साखर – 3-4 कप (किंवा चवीनुसार अंदाजे घ्यावी)
    • तूप – 2 ते 3 चमचे
    • वेलची पावडर – 1 चमचा
    • केसराच्या – काड्या (आवडीनुसार)

    एकूण कालवाधी – साधारण पाऊण तास

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!

    कृती

    1. प्रथम साबुदाणा कोरडाच सोनेरी रंगावर भाजून घ्यावा
    2. थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक वाटून घ्यावा.
    3. हे पिठ गरम तुपामध्ये मुरत ठेवावे. नंतर एका मोठ्या कढईत दूध गरम करायला ठेवावे, दुधाला उकळी आल्यावर गॅस मंद आचेचा करावा.
    4. या दुधामध्ये भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ हळूहळू टाकावे आणि एका हाताने घोटत जावे. दुधामध्ये साबुदाणा पिठाच्या गुठळ्या होता कामा नये.
    5. जोपर्यंत साबुदाणा दुधामध्ये पूर्णपणे मुरुन ते मिश्रण दाटसर होत नाही तोपर्यंत गॅसच्या मध्यम आचेवर ते घोटत रहावे.
    6. नंतर या मिश्रणात खोबऱ्याचा किस टाकावा आणि हे मिश्रण परत एकदा एकजीव करावे.
    7. जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा कढईला चिटकणे बंद होत नाही, तोपर्यंत घोटत राहावे.
    8. त्यानंतर त्यात तीन-चार कप साखर टाकावी. साखरेमुळे हे मिश्रण परत पातळ होईल. परंतु जसे जसे मिश्रण आटत जाईल, तसा याचा घट्ट गोळा तयार होईल.
    9. मिश्रण परत दाटसर झाले की, यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून सुका मेवा टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे.
    10. एका थाळीला तूप लावून त्यावर हे मिश्रण समान पसरवावे आणि त्यावर चांदीचा वर्ख लावून वरून पिस्त्याचे काप लावावेत.
    11. थंड झाल्यावर त्याचे आपल्या आवडीनुसार तुकडे कापून वड्या पाडाव्यात.

    हेही वाचा – Recipe : नागपूरची खासियत… तर्री पोहे

    टीप

    • या वड्या एयर-टाइट डब्यात ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.
    • दुधात बनवलेली ही साबुदाणा बर्फी मलाईदार आणि खूप स्वादिष्ट लागते.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn