Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»नात्याची पावनखिंड…
    ललित

    नात्याची पावनखिंड…

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 25, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, आजोबा, नातू, हळूवार नातं, आजोबावेडा केदार, Grandfather, grandson, gentle relationship, grandfather-crazy Kedar
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सतीश बर्वे

    बाबांची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी मी सुचेताला कळवली होती. ते ऐकून तिकडे अमेरिकेत तिच्या घरी काय परिस्थिती झाली असेल याची मला इथे मुंबईत राहून जाणीव होती. मला जास्त काळजी आजोबावेड्या केदारची होती. तीन आठवड्यांपूर्वी बाबांना हस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं कळल्यावर सुचेता एकटीच अगदी दोन-तीन दिवसांसाठी येऊन बाबांना भेटून गेली होती. केदारची पदव्युत्तर परीक्षा अगदीच तोंडावर असल्याने तो इच्छा असूनही तिच्यासोबत येऊ शकला नव्हता.

    सुचेताशी काल रात्री फोनवर बोलताना केदारही माझ्याशी बोलला… बोलताना ढसाढसा रडत होता. “काका, आजोबांना माझा मेसेज वाचून दाखव प्लीज…” अशी विनवणीही त्यानं केली. त्याने लिहिले होते –

    “तुम्हाला माझ्यासाठी थांबायचं आहे आजोबा! मला खात्री आहे की, देवबाप्पा माझं नक्की ऐकेल. आजपासून बरोबर 12 दिवसांनी माझी परीक्षा संपणार आहे… त्याच दिवशी रात्रीच्या फ्लाइटचं तिकीट मी काढलं आहे. त्यानंतर अवघ्या 15-16 तासांच्या प्रवासानंतर मी मुंबईत पोहोचेन. तिथून लगोलग तुम्हाला भेटायला येईन. आजोबा ऐकाल ना माझं? नाही, तुम्हाला ऐकावंच लागेल. तुमच्याच शब्दांत सांगायचं झालं तर ‘Don’t Surrender. Fight Out till end.’”

    केदारची इच्छा म्हणून बेडवरील चादरीच्या पांढऱ्या शुभ्र समुद्रात शीड तुटलेल्या अवस्थेत आणि असंख्य नळ्यांच्या विळख्यात अडकलेल्या… आज का उद्या, या दोलायमान स्थितीत असलेल्या बाबांच्या कानाजवळ जाऊन मी केदारचा मेसेज वाचला. बाबांच्या अंतर्मनाने तो कितपत ऐकला असेल देव जाणे! पण त्यावेळी त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या बोटांची मात्र थोडी हालचाल केली, असं मला जाणवलं. त्यातून काय ईश्वरी संकेत मिळत होते देव जाणे… पण का कोण जाणे मला उगाचच त्यांच्या जगण्याबद्दल अधिक आशा त्या दिवशी वाटली.

    पुढचा एकेक दिवस जायचा, तसं मी कॅलेंडरवर फुली मारायचो… 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि आज…

    बाबांच्या स्पेशल रूम बाहेर अचानक गलका ऐकू आला आणि पुढच्याच क्षणी घाईघाईने दरवाजा उघडून केदार आत आला आणि व्याकुळ होऊन जोरात म्हणाला, “आजोबा मी आलोय….”

    केदारचा आवाज ऐकून बाबांजवळ डोळे मिटून बसलेल्या माझी तंद्री भंग पावली. “काका,” असं म्हणून केदारने मला घट्ट मिठी मारली. ‘रडायचं नाही’ असं खूप ठरवून सुद्धा इतके दिवस जेमतेम थोपवून धरलेला भावनांचा बांध अखेर फुटलाच केदारच्या मिठीत…

    पुढच्या क्षणी नळ्यांच्या विळख्यात अडकलेल्या बाबांना बघून केदारला रडू फुटलं. त्यांच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवल्यावर केदारने त्यांच्या पायांना स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला.

    मी मनांतल्या मनांत देवाचे आभार मानले… त्या दोघांची अखेर भेट घडवून आणल्याबद्दल.

    हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…

    थोड्या वेळाने भावनेचा पूर ओसरल्यावर केदार भानावर येऊन म्हणाला, “काका मला शंभर टक्के खात्री होती की, आमची भेट होईस्तोवर आजोबा नक्कीच श्वास रोखून धरतील. शेवटी मी त्यांचाच नातू. कितीही अडचणी आणि अडथळे आले तरी हरकत नाही, पण शेवटपर्यंत लढत राहून आपल्याला जे साध्य करायचे आहे ते मिळवायचं, ही त्यांचीच शिकवण. आयुष्यात सुखाने जगण्यासाठी कायम लक्षात ठेवण्याची ही गोष्ट आजोबांनी  लहानपणापासूनच माझ्या मनावर बिंबवली होती. आमच्यात कायम मैत्रीचंच नातं होतं. आयुष्यात जगताना काय काय गोष्टींचं भान कायम ठेवायला लागतं, ते आजोबांनी मला शिकवले होतं… जे आज अमेरिकेत देखील मी कायम पाळत आलोय. त्याच शिकवणीच्या जोरावर त्यांच्या आणि माझ्या मधे उभ्या असलेल्या यमदेवाला जागचं हलू न देता मी आमची भेट घडवून आणली… फ्लाइटमध्ये सतत ‘आजोबा मी येतोय, तोपर्यंत वाट बघा माझी’ हेच शब्द माझ्या ओठांवर होते.”

    हेही वाचा – कलियुगातील सावित्री

    “त्यांचं प्रेम आणि शिकवण ही कवचकुंडले होती माझ्यासाठी जोपर्यंत मी मुंबईत होतो. पण बाबांची बदली अमेरिकेत झाली आणि नाईलाजाने मला आईबरोबर तिथे जावं लागलं. नंतर आजोबांशी खूप वेळा व्हिडीओ कॉलवर गप्पा मारायचो मी. दरवेळी माझी काळजी बोलून दाखवायचे…”

    “ते खरंच Fighter आहेत. जोवर आमची भेट होत नाही, तोवर मृत्यूसोबत आमच्या नात्याच्या पावनखिंडीत ते सर्व शक्तिनिशी लढत राहिले. आज अखेर मी आमच्या भेटीचा गड जिंकलाय आणि त्याचा आनंदाचा जयजयकार थेट अमेरिकेत जाऊन पोहोचला आहे…”

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn