Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : श्राद्ध पक्षासाठी आमसुलाची चटणी
    फूड काॅर्नर

    Recipe : श्राद्ध पक्षासाठी आमसुलाची चटणी

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 13, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, Recipe, रेसिपी, Sweet and sour, kokum chutney, Aamsul  chutney, कोकम चटणी, आमसुलाची चटणी, आमसूल चटणी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. पितरांसाठी करावयाचे विधी  कृष्ण पक्षात आणि विशेषत: अमावस्येला करतात. कारण, माणसाचा एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस आणि एक रात्र (माणसाचा कृष्ण पक्ष म्हणजे त्यांचा दिवस आणि शुक्लपक्ष म्हणजे रात्र), असे मानले जाते. विशेषत:, भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष आणि भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावास्या, असे म्हटले जाते. यानिमित्ताने अन्नदान केले जाते आणि यासाठी विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ केले जातात. त्यापैकीच एक आमसुलाची चटणी. त्याची रेसिपी पाहूया.

    साहित्य

    • आमसुले‌ (कोकम) – 10 ते 12
    • जिरं – 1 टीस्पून
    • मिरी – 2 ते 3 दाणे
    • गूळ – साधारणपणे 1 वाटी
    • मीठ – चवीनुसार
    • आलं – 1 लहान तुकडा

    पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी

    तयारीस लागणारा वेळ :

    • आमसुलं भिजण्यासाठी – दीड तास
    • भिजवलेली आमसुलं आणि इतर साहित्य मिक्सरवर बारीक करण्यासाठी- 3 मिनिटे

    हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट

    कृती

    1. आमसुले (कोकम) दीड तास गरम पाण्यात भिजवून ठेवा.
    2. दीड तासांनी मिक्सरच्या भांड्यात जिरं, मिरं, मीठ, आलं हे सगळं पाणी न घालता वाटून घ्या.
    3. वाटून झाल्यावर भिजवलेली आमसुले (कोकम) त्यात घाला. आमसुले भिजवलेले थोडेसे पाणीही घाला.
    4. परत एकदा मिक्सरमध्ये हे मिश्रण फिरवून घ्या.
    5. आता त्यात गूळ घाला आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्या.
    6. अशा प्रकारे आमसुलाची चटणी तयार.

    विशेष आहार माहिती : शाकाहारी, औषधी

    हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस

    टीप

    • गुळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी, जास्त करू शकता.
    • तिखटपणा अधिक हवा असेल तर, मिरीचे प्रमाण किंचित वाढवावे किंवा थोडेसे लाल तिखट वापरले तरी चालेल.
    • काही ठिकाणी या चटणीला हिंग, जिऱ्याची फोडणी देतात. त्यानेही एक वेगळी चव येते

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn