Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 सप्टेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 सप्टेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 7, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 07 सप्टेंबर 2025; वार : रविवार
    • भारतीय सौर : 16 भाद्रपद शके 1947; तिथि : पौर्णिमा 23:38; नक्षत्र : शततारका 21:41
    • योग : सुकर्मा 09:22; करण : विष्टी 12:43
    • सूर्य : सिंह; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:48
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    प्रौष्ठपदी पौर्णिमा

    पौर्णिमा समाप्ती रात्री 11:38

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660

    हेही वाचा –  निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…


    दिनविशेष

    प्राच्यविद्या पंडित भाऊ दाजी लाड

    टीम अवांतर

    महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक तसेच कुशल धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रामकृष्ण विठ्ठल लाड म्हणजेच भाऊ दाजी लाड यांचा जन्म 7 सप्टेंबर 1822 रोजी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. भाऊ दाजींचे उच्च  शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. त्यांनी खासगीरित्या  संस्कृतचे देखील अध्ययन केले. भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरात विभागातील बालकन्या हत्येच्या अनिष्ट प्रथेवर इंग्रजी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंधस्पर्धेत त्याला 600 रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. 1845 मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली, तेव्हा भाऊंनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांनी फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि 1851 साली वैद्यकशास्त्रात पदवी घेतली. अचूक निदान आणि शस्त्रक्रियेतील कौशल्य यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषधही त्यांनी शोधून काढले. दादाभाई नवरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले. मुंबईत कागद आणि कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. 1854 मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात. विधवाविवाहच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठींबा दिला. त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने 1864 साली त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली. मुंबईतील राणीचा बाग (जिजामाता उद्यान), ॲल्बर्ट म्युझियम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इस्टिट्यूट या संस्था स्थापन करण्यासाठी ते अग्रेसर होते. भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इत्यादी वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. पुढे 1865  मध्ये त्यांच्यावर आर्थिक संकट आले. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत.  त्यातच पक्षाघाताने त्यांचे मुंबईमध्ये 31 मे 1874 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ मुंबई  विद्यापीठात संस्कृत विषयात बी. ए. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.

    हेही वाचा – Homeopathy : चिमुकल्यांची निरोगी वाढ झाली तर, उज्वल भविष्य घडतं…

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn