Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : चमचमीत वाटली डाळ
    फूड काॅर्नर

    Recipe : चमचमीत वाटली डाळ

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 5, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, रेसिपी, Recipe, वाटली डाळ, चमचमीत डाळ, स्वादिष्ट वाटली डाळ, Watali Daal, Watli Daal, Watli Dal, Watali Dal, Tasty Dal, delicious dal
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    साहित्य

    • हरभरा डाळ – दीड वाटी
    • तेल – 3 टेबलस्पून
    • हिरव्या मिरच्या – 2 ते 3
    • आलं – 1 इंच
    • कढीलिंब पाने – सात ते आठ
    • साखर – 1 टेबलस्पून
    • मीठ – चवीनुसार
    • मोहरी – 1 लहान चमचा
    • हिंग – पाव लहान चमचा
    • हळद – अर्धा लहान चमचा
    • लिंबू – अर्धे
    • कोथिंबीर – आवडीनुसार (वरून सजावटीसाठी)
    • ओलं खवलेलं खोबरं – आवडीनुसार (वरून सजावटीसाठी)

    पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी

    तयारीस लागणारा वेळ :

    • हरभरा डाळ भिजण्यासाठी 5 तास
    • भिजवलेली डाळ वाटून घ्यायला 7 मिनिटे
    • शिजवण्याचा वेळ : साधारणपणे 20 मिनिटे
    • एकूण वेळ : 5 तास 27 मिनिटे

    विशेष आहार माहिती : शाकाहारी

    हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट

    कृती

    1. हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 5 तासांसाठी पुरेशा पाण्यात भिजवून ठेवा.
    2. पाच तासांनी डाळ उपसून मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमधून फिरवून घ्या. फिरवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. एकदा फिरवून झाल्यानंतर त्यात आलं, हिरवी मिरची घालून पुन्हा एकदा मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमधून फिरवून घ्या. वाटताना ही डाळ पूर्ण बारीक करायची नाही, जरा जाडसरच  ठेवायची.
    3. कढईत फोडणीसाठी तेल तापायला ठेवा. तेल गरम झाले की, त्यात मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की, मग त्यात हिंग, हळद आणि कढीलिंब पाने घाला. त्यात वाटलेली डाळ घालून एकदा छान ढवळून घ्या आणि त्यावर झाकण ठेवा.
    4. डाळ शिजायला साधारपणे पाच ते सहा वाफा द्याव्या लागतात. एक वाफ तीन मिनिटांची असते.
    5. डाळीला पाच वाफा आल्या की, त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून सगळं छान मिक्स करून शेवटची वाफ येऊ द्या.
    6. शेवटची वाफ आली की, गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेलं ओलं खोबरं घाला.

    हेही वाचा – Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी

    टीप

    • डाळ वाटून झाल्यावर कुकरच्या भांड्यात काढून दोन शिट्ट्या देऊन मग फोडणीला टाकली तर तेलही कमी लागते आणि डाळही लवकर होते
    • हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी करून फोडणीत अर्धा छोटा चमचा लाल तिखटही वापरू शकता.
    • फोडणी देताना मोहरीबरोबरच जिरंही वापरू शकता.
    • वाटल्या डाळीचा नैवेद्य बाप्पालाही दाखवू शकता.

      तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

      avaantar.recipe@gmail.com

      या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn