Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 28, 2025Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली

    अध्याय दुसरा

    वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोsपराणि ।   तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥22॥

    जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसे देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥144॥

    नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥23॥ अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥24॥

    हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥145॥

    अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥25॥

    हा प्रळयोदकें नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥146॥ अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥147॥ हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥148॥ हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना। निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥149॥ हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु । अनादि अविकृतु । सर्वरूप ॥150॥ अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥151॥

    अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतम् । तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥26॥

    अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हें मानिसी । तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥152॥ जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥153॥ तें आदि नाहीं खंडलें । समुद्रीं तरी असे मिनलें । आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ॥154॥ इयें तिन्हीं तयापरी । सरसींच सदा अवधारीं । भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥155॥ म्हणोनि हे आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे स्थितीची हे स्वभावें । अनादि ऐसी ॥156॥ ना तरी हे अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥157॥ तरी येथ कांही । तुज शोकासि कारण नाहीं । जे जन्ममृत्यु हे पाहीं । अपरिहर ॥ 158॥

    जातस्य हि ध्रुवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च। तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥27॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : आतां अर्जुना आणिक कांही एक सांगेन मी आइक…

    अर्थ

    ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन घेतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून देऊन दुसरी नवी प्राप्त करून घेतो. ॥22॥

    ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. ॥144॥

    याला (आत्म्याला) शस्त्र तोडीत नाहीत, अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही आणि वारा सुकवीत नाही. ॥23॥ या आत्म्याचा छेद होणे, दाह होणे, तो आर्द्र होणे आणि शुष्क होऊन जाणेही अशक्यच आहे. हा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल आणि सनातन आहे. ॥24॥

    हा आत्मा अनादी, नित्यसिद्ध (शाश्वत असणारा), उपाधिरहित आणि अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगाने घात होत नाही. ॥145॥

    हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य आणि अविकारी असल्याचे म्हटले आहे. म्हणून याला याप्रकारे  (सकलात्मक) जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही. ॥25॥

    हा (आत्मा) प्रलयकाळाच्या पाण्याने बुडत नाही, हा अग्नीने जळणे संभवत नाही. येथे वायूच्या महाशोषणशक्तीचा प्रभाव चालत नाही. ॥146॥ अर्जुना, हा नित्य, स्थिर, शाश्वत असून सर्व ठिकाणी भरलेला असा आहे. ॥147॥ अर्जुना, हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही. ध्यान तर याच्या भेटीसाठी उत्कंठित झालेले असते. ॥148॥ हा मनाला नेहमी दुर्लभ आहे आणि साधनाला प्राप्त न होणारा (आहे.) हा पुरुषोत्तम अनंत आहे. ॥149॥ हा (सत्वादि) तीन गुणांनी रहित, आकाराच्या पलीकडचा, अनादि, विकार न पावणारा आणि सर्वव्यापी आहे. ॥150॥ अर्जुना, असा हा आहे, हे लक्षात घे. हा सकालात्मक आहे, हे ओळख. मग तुझा हा सगळा शोक आपोआप नाहीसा होईल. ॥151॥

    हे महाबाहो, हा आत्मा नेहमी (प्रत्येक देहोत्पत्तीच्य वेळी) जन्म पावतो आणि नेहमी मृत्यू पावतो, असे जरी मानलेस तरीदेखील शोक करणे तुला योग्य नाही. ॥26॥

    अथवा हा असा आहे, हे न जाणता तू (हा) नाशवंतच आहे असे जरी मानलेस, तरी अर्जुना, तुला शोक करणे उचित नाही. ॥152॥ कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे, तसा उत्पत्ती स्थिती आणि नाश यांचा क्रम अखंड आहे. ॥153॥ ते (गंगाजल) उगमस्थानी तुटत नाही, (त्याची उत्पत्ती एकसारखी सुरूच असते) व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते, ॥154॥ त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तिन्ही बरोबरच असतात, असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबविता येत नाहीत. ॥155॥ म्हणून या सगळ्यांचा शोक करण्याचे येथे तुला कारण नाही; कारण मुळापासूनच स्वभवत: अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे. ॥156॥ अथवा अर्जुना, हा जीवलोक जन्ममृत्यूच्या अधीन आहे, असे पाहून जरी हे (वरील म्हणणे) तुझ्या मनाला येत नसेल ॥157॥ तरी पण त्यात तुला शोक करण्याचे कारण नाही. (कारण) असे पहा की हे जन्ममृत्यु हे टाळता न येणारे आहेत. ॥158॥

    कारण की, उत्पन्न झालेल्याला नि:संशय मृत्यू आहे आणि मेलेल्याला निःसंशय जन्म आहे. म्हणून अटळ अशा गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. ॥27॥

    क्रमश:

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    हेही वाचा – Dnyaneshwari : तूं धरूनि देहाभिमानातें…

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn