Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : हरतालिका विशेष ‘निनाव’… अन् बाप्पासाठी रोझ मोदक
    फूड काॅर्नर

    Recipe : हरतालिका विशेष ‘निनाव’… अन् बाप्पासाठी रोझ मोदक

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 25, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, निनाव, निनावा, मोदक, रोझ मोदक, गणपती, बाप्पा, नैवेद्य, हरतालिका, Ninav, Ninava, Modak, Rose Modak, Ganapati, Bappa, Naivedya, Hartalika
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हर्षा गुप्ते

    निनाव

    साहित्य

    • बेसन – 1 वाटी
    • ओल्या नारळाचं दूध – अडीच वाटी
    • गूळ पावडर – दीड वाटी
    • वेलची पावडर
    • साजूक तूप

    पुरवठा संख्या – दोघांसाठी

    कालावधी – साधारणपणे 20 मिनिटे

    कृती

    1. नारळाच्या दूधामध्ये गूळाची पावडर घालून ठेवा. जेणेकरून गूळ लवकर विरघळेल.
    2. एक वाटी बेसन मंद आचेवर जाड बुडाच्या कढईत खमंग भाजून घ्या.
    3. मंद आचेवर भाजलेल्या बेसनमध्ये हळूहळू गूळ मिश्रित नारळाचे दूध घालून ढवळत रहा. म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि सतत ढवळल्याने करपणारही नाही.
    4. त्यात नंतर वेलची पावडर आणि साजूक तूप घालायचे.
    5. यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढायची.
    6. कढईत खाली हलकेसे करपल्यावर निनावं एकदम खरपूस लागते.
    7. वाटीत काढून हरतालिका गौरीला त्याचा नैवेद्य दाखवायचा.

    टिप

    • निनाववर ड्रायफ्रुट्सचे तुकडे टाकून सजवू शकता.

    हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी


    रोझ मोदक

    साहित्य

    • मोदक पिठ – 1 मोठी वाटी
    • ओलं खोबरं – 1 वाटी (सारणासाठी)
    • गूळ किंवा साखर – अर्ध्या वाटीपेक्षा कमी (सारणासाठी)
    • गुलकंद – 2 टेबलस्पून (सारणासाठी)
    • रोझ इसेन्स – 1 चमचा
    • खायचा लाल रंग – अर्धा चमचा
    • तेल
    • पाणी
    • वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या

    कालावधी – तास ते सव्वातास

    कृती

    1. पाऊण वाटी पाणी आणि चमचाभर तेल एकत्रित उकळवा.
    2. पाण्याला चांगली उकळी आली की, त्यात एक वाटी मोदक पिठ घालून ते चांगलं मिक्स करा, नंतर त्यावर झाकण ठेवा आणि गॅस बंद करा.
    3. पिठात वाफ जिरेपर्यंत ओलं खोबरं आणि गूळ/साखर घालून सारण बनवून मंद आचेवर ठेवा.
    4. गूळ/साखर विरघळून खोबऱ्यात चांगले मिक्स झाले की, नंतर गॅस बंद करा.
    5. सारण थंड झाल्यावर त्यात दोन टेबलस्पून गुलकंद घालून ते एकत्रित करा.
    6. आता वाफेतल्या पिठात एक चमचा रोझ इसेन्स आणि अर्धा चमचा खायचा लाल रंग घालून पिठ मळून घ्या.
    7. आता त्याचे सारखे भाग करून उंडे करा. एक उंडा घेऊन त्याची पारी बनवा. त्यात गुलकंद मिश्रित सारण भरा. त्यानंतर पारीच्या पाकळ्या करा आणि त्या एकत्र करून मोदकाचा आकार द्या.
    8. मोदकाची खालची बाजू पाण्यात बुडवून ते मोदक पात्रात ठेवा. मोदक पात्र गॅसवर मंद आचेवर ठेवा. 15 मिनिटांनी गॅस बंद करा.

    टिप

    • तयार मोदक ताटात घेऊन त्यावर एक-एक वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवून सजवा आणि आपल्या बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवा.
    • गरम मोदक उघडून त्यावर साजूक तुपाची धार सोडून त्याचा आस्वाद घ्या.

    हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn