Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 ऑगस्ट 2025
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 ऑगस्ट 2025

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 10, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्राजक्ता अनंत काथे

    (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)

    मेष

    या आठवड्यात नोकरदारांना अधिक जबाबदारीची कामे येऊ शकतात. त्या कामांसोबत यशाची संधी मिळण्याची शक्यता आहे. संधीचा उपयोग करण्यासाठी वेळेचे नियोजन करा. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. महिलांनी मानसिक प्रसन्नता टिकवण्यास प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी लागेल. शक्यतो प्रवास टाळावा.

    वृषभ

    या आठवड्यात व्यावसायिक लोकांना आर्थिक फायदा संभवतो. त्यामुळे नवीन क्षेत्रात प्रवेश करू शकाल. आपल्या प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. घरातील जेष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी. महिला कलात्मक दृष्टिकोनातून विषयांची मांडणी करतील आणि महिला मंडळात नाव कमवू शकाल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. करिअरशी संबंधित प्रवास होऊ शकतो.

    मिथुन

    या आठवड्यात नोकरदारांना वरिष्ठांकडून जास्त काम मिळण्याची शक्यता आहे. प्रतिकूल काळात सर्वांशी जुळवून घ्यावे लागू शकते. आर्थिक गणिते उत्तम जमतील. नवीन गुंतवणूक करू शकाल. कौटुंबिक गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिलांनी संवादावर भर द्यावा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. प्रवास लांबण्याची शक्यता आहे.

    कर्क

    या आठवड्यात काळानुसार बदलण्याची तयारी ठेवावी लागेल. नवीन गोष्टी शिकाव्या लागू शकतात. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन करावे लागेल. आरोग्य चांगले राहील. महिलांचे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शाळा किंवा कॉलेजमधील स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता येईल आणि यश मिळेल.

    सिंह

    या आठवड्यात नवीन ओळखी होतील. लोकांची नीट पारख करा. गोड बोलण्याने फसण्याची शक्यता आहे. आर्थिक येणी उशिरा येतील, त्यामुळे कामाचा वेग कमी होऊ शकतो. महिलांनी गृहकर्तव्यांमध्ये दुर्लक्ष करू नये. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुरू ठेवा, यश नक्की मिळेल.

    कन्या

    या आठवड्यात कामासंदर्भात वरिष्ठांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. कामांना गती मिळाल्यामुळे उत्साही वाटेल. ठाम भूमिका ठेवा. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. महिलांनी गृहकर्तव्यांना प्राधान्य द्यावे. योग्यवेळी आराम करावा. आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे. प्रवास फलदायी ठरेल.

    हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन

    तुळ

    या आठवड्यात मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या आदर्श जीवनशैलीचे कौतुक होऊ शकते. नवीन संकल्पना मांडता येतील आणि त्यांचे स्वागत होईल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे, त्याचा फायदा होईल. महिलांची जुनी दुखणी परत उद्भवू शकतात, काळजी घ्या. विद्यार्थ्यांना मित्रांसोबत लांबचा प्रवास होऊ शकतो.

    वृश्चिक

    या आठवड्यात चिकाटी आणि संयमाने राहिलेली कामे पूर्ण करा. निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करा. कार्यक्षेत्रात नव्या बदलांसाठी पुढाकार घेतल्यास फायदा होईल. आर्थिक गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. महिलांना कौटुंबिक स्नेहींच्या भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील. प्रवासात अडथळे येऊ शकतात, काळजी घ्या.

    धनु

    या आठवड्यात कामात यश मिळेल. जास्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती भक्कम राहील. खर्चाचे योग्य नियोजन करून नव्या योजना तयार करू शकाल. घरातील वरिष्ठांची चांगली काळजी घेऊ शकाल. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, प्रामाणिक प्रयत्न करा.

    मकर

    या आठवड्यात सकारात्मक विचार ठेवा. कामाच्या ठिकाणी संयम आवश्यक आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. स्नेही आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शब्द जपून वापरा. महिलांना भाऊ-बहिणींच्या भेटी होतील, वातावरण प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि अनावश्यक भटकंती टाळावी.

    कुंभ

    या आठवड्यात कामाचा ताण राहील. साचलेली कामे अंगावर येतील. संयमाने आणि संवाद साधून कामे वेळेत पूर्ण करू शकाल. आर्थिक लाभ होईल. ऑफिसमधील राजकारण मानसिक त्रास देऊ शकते. महिलांनी आप्तेष्टांचे मन सांभाळण्याचा प्रयत्न करावा.

    हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव निवारणाची आवश्यकता

    मीन

    या आठवड्यात सुरुवातीलाच पैशाचे आणि कामाचे नियोजन करावे लागेल. जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. बचतीचे नवीन पर्याय मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मानसिक स्वास्थ्य सुधारेल. महिलांना मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, त्याचे उत्तम फळ मिळेल.

    prajaktakathe3970@gmail.com

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn