Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»Homeopathy : शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग
    आरोग्य

    Homeopathy : शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 26, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, PureHealth HarmoniousHealth, Homeopathy, होमिओपॅथी, शुद्धआरोग्य, सुसंवादीआरोग्य
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉक्टर सारिका जोगळेकर

    होमिओपॅथीचा (Homeopathy) शोध डॉक्टर Samuel Hahnemann यांनी जर्मनीमध्ये 1796 साली लावला. होमिओपॅथी हा शब्द दोन ग्रीक शब्दांमधून तयार झाला आहे. ‘Homois’ म्हणजे समान आणि ‘pathos’ म्हणजे दुःख.

    त्या काळातील सर्व वैद्यकीय पद्धती फार वेदनादायक आणि हानिकारक, अशा होत्या. (उदा. गरम लोखंडाचा वापर, अतिरक्तस्त्राव). Dr. Samuel Hahnemann यांचा घातक परिणाम होणाऱ्या प्रक्रियेवरील विश्वास उडाला होता. त्यांनी या पद्धतींचा विरोध केला आणि एका सौम्य उपचार पद्धतीचा शोध सुरू केला. Dr. Hahnemann यांनी सर्व वैद्यकीय ग्रंथ वाचून पाहिले, पण त्यात त्यांना समाधानकारक योग्य तत्वे दिसली नाहीत. प्रयोग करताना cinchona bark नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे त्यांना दिसली होती. परंतु हेच औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. त्यावर त्यांनी असा निष्कर्ष काढला की “समान लक्षणे समान उपचाराने बरे होतात” यालाच “similia similibus curentur” (like cures like) असा सिद्धांत दिला आणि होमिओपॅथीचा शोध लागला.

    Dr. Hahnemann यांच्या या सिद्धांताची सविस्तर माहिती ‘The organon of the rational art of healing’ या ग्रंथात 1810 साली प्रकाशित झाली. त्यानंतर उपचार शास्त्रातील एक नवीन प्रवास सुरू झाला. सौम्य, नैसर्गिक आणि अद्भुत अशा होमिओपथीचा.

    हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान

    होमिओपॅथी ही मूलभूत तत्वांवर आधारित असलेली एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. औषधे नैसर्गिक असून ती अत्यंत सूक्ष्म प्रमाणात दिली जातात. नैसर्गिक घटक dilute (पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये) किंवा sucuss (झटके देणे) अशा दोन पद्धतीने सूक्ष्म केली जातात आणि त्या क्रियेला ‘potentization’ म्हणजेच ‘शक्तीकरण’ असं म्हणतात.  या प्रक्रियेमुळे पदार्थाचे औषधी गुणधर्म वाढतात, पण त्यांचे दुष्परिणाम मात्र कमी होतात. जितक्या वेळा आपण ही प्रक्रिया करतो तितक्या पटीने त्या औषधाची शक्ती (potency) वाढत जाते. 6X, 30C, 200C, इत्यादी.

    होमिओपॅथिक औषधांचे प्रयोग (proving) करताना ते निरोगी व्यक्तींना दिले जातात आणि त्यांच्यात जी लक्षणे दिसून येतात, त्याची नोंद केली जाते. शारीरिक, मानसिक तसेच भावनिक अशा हॉलिस्टिक पातळीवर औषधांचे proving केले जाते. ती लक्षणे कशामुळे वाढतात किंवा कमी होतात (modalities) या सगळ्याची नोंद केलेल्या पुस्तकाला मटेरिया मेडिका म्हणतात. अशा असंख्य नैसर्गिक पदार्थांच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास आजपर्यंत केला गेलेला आहे आणि तो पुढेही सुरूच राहणार आहे.

    हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या

    होमिओपॅथी ही शिस्तबद्ध, स्थिर आणि परिणामकारक असून वर्षानुवर्ष तिने स्वतःची ओळख आणि विश्वास टिकवून ठेवलेला आहे. नैसर्गिक औषधातून केवळ आजार नाही, तर माणसाचं संपूर्ण व्यक्तिमत्व बरे करणारी होमिओपॅथी – एक शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग आहे.

    क्रमश:

    Holistic Homoeocure Clinic
    ठाणे पश्चिम

    https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr

    https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn