Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 20 जुलै 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 20 जुलै 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 20, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 20 जुलै 2025; वार : रविवार

    भारतीय सौर : 29 आषाढ शके 1947; तिथि : दशमी 12:13; नक्षत्र : कृत्तिका 22:53

    योग : गंड 21:47; करण : बव 22:56

    सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18

    पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन

    संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    गायिका गीता दत्त

    टीम अवांतर

    अल्पायुषी जीवनात आपल्या मधाळ आवाजाने हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या गीता घोष रॉय चौधरी अर्थात गीता दत्त यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1938 रोजी सध्याच्या ढाकामध्ये झाला. एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात जन्माला आलेल्या गीता दत्त यांचे संगीत शिक्षक हिरेंद्रनाथ नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली गाण्याचे शिक्षण झाले. पुढे 1942 मध्ये पूर्व बंगाल सोडून त्यांचे सगळे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यानंतर संगीतकार के. हनुमान प्रसाद यांनी 1946 मध्ये सोळा वर्षांच्या गीता दत्त यांना ‘भक्त प्रल्हाद’ या पौराणिक चित्रपटात पहिला ब्रेक दिला. त्यावेळी दोन गाण्यांमधील प्रत्येकी दोन ओळी त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. पुढे 1947 साली ‘दो भाई’ या चित्रपटातील प्रसिद्ध झालेले ‘मेरा सुंदर सपना बीत गया’ हे गाणे त्यांनी गायले आणि पुढील दोन वर्षांमध्ये जवळपास 37 चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. 1951 साली ‘बाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शक गुरु दत्त आणि त्यांची भेट झाली. या भेटीचे पर्यावसान प्रेमात आणि मग लग्नात झाले. लग्नानंतर गुरू दत्त यांच्या जवळपास सगळ्याच चित्रपटांमध्ये गायिका म्हणून गीता यांचाच आवाज वापरला गेला. 1950च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि सर्वाधिक मागणी असलेल्या गायिकांपैकी एक असणाऱ्या गीता दत्त यांची कारकीर्द नंतर झपाट्याने घसरायला लागली.  गुरू दत्त यांच्याबरोबरच्या वैवाहिक जीवनातील कुरबुरी आणि त्यातून त्यांना लागलेली मद्यपानाची सवय यामुळे पार्श्वगायनाच्या ऑफर कमी होऊ लागल्या. 1956 साली त्यांना वैयक्तिक दिवाळखोरी जाहीर करावी लागली. पुढे 1964 साली गुरू दत्त यांच्या निधनानंतर गीता यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत गेल्या आणि शेवटी वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी 20 जुलै 1972 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

    हेही वाचा – Discipline : कडक शिस्त… आयुष्याला वळण लावणारी!

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn