Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»आयुर्वेद अन् ऋतुचर्या
    आरोग्य

    आयुर्वेद अन् ऋतुचर्या

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 6, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    ऋतुचर्या, आयुर्वेद, अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, जीवनशैली, ऋतुचक्र, ऋतुचर्या, Diet, lifestyle, Ayurveda, Seasonal_cycle, Seasonal_diet, seasonal_behavior
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रिया गुमास्ते

    ‘अरे, किती आइसक्रीम खातोयस? थंडीत बाधेल की…’, आयुर्वेदाची माहिती असणारी आजी आपल्या नातवाला एक प्रकारे ऋतुचर्या समजावत होती. कधी काय खाणे योग्य, काय अयोग्य याची चर्चा बर्‍याच घरांमध्ये होत असते. ऋतुमानानुसार कसे वागावे, काय खावे जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण आजारी पडणार नाही, याचे सखोल मार्गदर्शन आयुर्वेदात केले आहे.

    ऋतुचर्या म्हणजे काय?

    ऋतौ ऋतौ आचरणीय: विधि: ऋतुचर्या इति अभिधीयते।

    वेगवेगळ्या ऋतुनुसार आपल्या आहारविहारात केलेले बदल म्हणजे ऋतुचर्या. यामुळे शरीरातील दोष (वात, पित्त, कफ) संतुलित राहतात आणि आरोग्य चांगले राहते.

    पण ऋतू म्हणजे काय? आणि कोणता ऋतू सुरू आहे, हे कसे ओळखायचे?

    मासैर्द्विसङ्ख्यैर्माघाद्यै: क्रमात् षडृतव: स्मृता:।
    शिशिरोऽथ वसन्तश्च ग्रीष्मवर्षाशरद्धिमा:॥
    अष्टाङ्गहृदयम् सूत्रस्थानम् 3.1

    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, ऋतुरंग, शिशिर, श्रावण, गुढीपाडवा, शिशिर

    ऋतू म्हणजे द्वौ मासौ वा दोन महिने. आपल्या बारा महिन्यांना प्रत्येकी 2 महिन्यांच्या भागांत विभागले आहे आणि त्या दोन महिन्यांचा एक ऋतू बनतो. त्यामुळे जरी बाकी जगात फक्त चार ऋतू मानले असले तरी, आयुर्वेदाप्रमाणे सहा ऋतू आहेत. ते म्हणजे –

    • वसन्त (Spring)
    • ग्रीष्म (Summer)
    • वर्षा (Rainy season)
    • शरद् (Autumn)
    • हेमन्त (Early winter)
    • शिशिर (Late winter)

    हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान

    या सहा ऋतुंची महिन्यांनुसार विभागणी पुढील प्रमाणे केली आहे.

    माघ: फाल्गुनश्चशिशिर:चैत्र: वैशाखश्चवसन्त: ज्येष्ठ: आषाढश्चग्रीष्म:श्रावण: भाद्रपदश्चवर्षाअश्विन: कार्तिकश्चशरद्मार्गशीर्ष: पौषश्चहेमन्त:||

    • वसन्त  (Spring) – चैत्र, वैशाख
    • ग्रीष्म (Summer) – ज्येष्ठ, आषाढ
    • वर्षा (Rainy season) – श्रावण, भाद्रपद
    • शरद् (Autumn) – अश्विन, कार्तिक
    • हेमन्त (Early winter) – मार्गशीर्ष, पौष
    • शिशिर (Late winter) – माघ आणि फाल्गुन

    ऋतुचर्येची आवश्यकता काय?

    ‘यत् पिंडे तत् ब्रह्मांडे |’ या उक्तीनुसार, ‘तुमचे शरीर एक लहान विश्व आहे.’ निसर्गाप्रमाणेच आपले शरीरही पंचमहाभूतांनी बनलेले आहे. निसर्गात होणार्‍या बदलांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळेच जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) ऋतुनुसार बदल केले नाहीत तर, आपण आजारी पडण्याची खूप शक्यता वाढते आणि म्हणूनच प्रत्येक ऋतुमधील वातावरण बदलांचा शरीरावर काय परिणाम होतो आणि त्यानुसार आपण काय  बदल केले पाहिजेत, हे आपण पुढच्या भागात पाहू.

    (क्रमश:)

    Mobile : 9819340378

    हेही वाचा – त्वचा आणि त्वचेवर परिणाम करणारे घटक

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn