Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»आईला लागले भारतात परतण्याचे वेध
    ललित

    आईला लागले भारतात परतण्याचे वेध

    Team AvaantarBy Team AvaantarApril 14, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, नवरात्री, आईची_लंडनभेट, लंडन_भारत, मंदार_पाटील
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मंदार अनंत पाटील

    आई लंडनला असताना गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. 7 सप्टेबर 2024ला लाडक्या गणरायाचे वाजतगाजत आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले. यथासांग प्रतिष्ठापनेचे सर्व विधी पार पडले. पल्लवीने रात्रभर जागून हरितालिकेची उपासना, पूजेची तयारी आणि सोबतच प्रसादाचे नियोजन करून ठेवले होते. तसेच युट्युबवरून फडके गुरुजींची पूजाही डाऊनलोड करून ठेवली होती. पूजेची सगळी तयारी आधीपासूनच होती. त्यामुळे कुठेही अडचण आली नाही.

    आईला लंडनमधील सार्वजनिक गणपती दाखवायला घेऊन गेलो. तिथे तर मुंबईसारखे ढोल-ताशे आणि मिरवणूक बघून आईचा विश्वास बसला की, भारताबाहेरही तितक्याच दणक्यात सगळे सणं साजरे होतात. बघता-बघता गणपती विसर्जनाचा दिवस आला. संध्याकाळी उत्तरपूजा करून ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषात गणरायाला निरोप दिला आणि रिकाम्या पाटासह परत आलो.

    या वर्षी अधिक महिना असल्याने गणपतीचे विसर्जन झाल्यावर लगेच पितृपक्ष सुरू झाला. पल्लवी दरवर्षी न चुकता माझ्या दिवंगत बाबांची आठवण म्हणून कागावळ (कागवास) ठेवते. यावर्षी आई लंडनमध्येच असल्यामुळे आणखी सखोल माहिती घेऊन तिने बाबांच्या आवडीचे पदार्थ बनविले.

    हेही वाचा – आईबरोबरचा लंडनमधला पहिला गणेशोत्सव

    आई आणि पल्लवी आता नवरात्रीच्या तयारीला लागल्या. मी फक्त घरात साफसफाई आणि थोडेफार डेकोरेशन करून माझे अंग काढून घेतले. पल्लवीने पुन्हा एकदा पदर खोचून सगळी तयारी केली. आई देखील कलाकुसर करण्यात गढून गेली. सुरेख रांगोळी काढून त्यावर हत्तीच्या आकाराचे आसन ठेऊन त्यावर घटस्थापना केली. मी आधीच देवीचा मुखवटा आणि काही किरकोळ सामान आणून ठेवले होते. डेकोरेशनही वेळत पूर्ण केले. नवरात्रीची सुरुवात झोकात झाली. पल्लवीने रोज पिठाचे दिवे करून आरती केली. तर, आईने नऊ दिवसांकरिता मण्यांच्या नऊ माळा तयार करून ठेवल्या. पण हे सगळे करत असताना आता आईला भारतात परतीचे वेधही लागले. आई 18 जुले 2024 रोजी लंडनला आली होती. आता 18 ऑक्टोबर 2024ला आई आणि पल्लवी दोघीही भारतात जाणार होत्या. पल्लवी दिवाळी आणि वाढदिवस साजरा करायला जात होती. आई तीन महिन्यांच्या आठवणींची शिदोरी घेऊन मोठ्या लेकाकडे जाणार होती.

    आई तब्बल 18 वर्षांनी लंडनला आली होती. तिच्यासाठी आधी लंडनदर्शनाच्या नियोजनाची लगबग सुरू हती. त्यानुसार स्वामी नारायण मंदिर, बकिंगहॅम पॅलेस, रॉयल म्युझियम, ग्रीन पार्क, लंडन आय, लंडन एक्वेरियम, लंडन ब्रीज, मेडनहेड मत्स्यालय… अशा अनेक स्थळांना भेटी दिल्या. आई येताना जिवतीचा कागद घेऊन आली होती. सोबत सत्यनारायणाची पूजा-पोथीही आणली होती. आपल्याकडे पहिल्यांदाच श्रावणातील व्रतवैकल्याबरोबरच पूजा होणार म्हणून मी आणि पल्लवी खूप आनंदीत झालो होतो. श्रावणातील सणवार आणि सत्यनारायणाची पूजा यथावकाश आणि साग्रसंगीत पार पडले… अशा आठवणींची शिदोरी पल्लवी आणि माझ्याकडे होतीच की!

    हेही वाचा – गणेशोत्सवाचा उत्साह अन् वन-डे ट्रिप

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn