Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»न्याहारी… लेकीच्या हातची सुखावणारी!
    ललित

    न्याहारी… लेकीच्या हातची सुखावणारी!

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 12, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, रविवारची न्याहारी, रविवारचा ब्रेकफास्ट, अंडी ब्रेड, एग ब्रेड, लसणाच्या स्वाद, Butter Garlic Scrambled Eggs, अंडा भुर्जी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    काल बायको गेली तिच्या सख्यांबरोबर जिवाचं अलिबाग करायला आणि रविवारी सकाळी मी आणि लेक दोघेच घरात! ‘धुडगूस घालू नका, पसारे करू नका, मोलकरीण येईल तिच्याकडून काम करून घ्या, अंथरूणांच्या घड्या घाला, मशीन लावून कपडे नीट वाळत घाला…’ अशा असंख्य सूचनांचा भडिमार करत एकदाची ती गेली. शनिवारी तिला तिच्या मैत्रिणींच्या ताब्यात दिलं, डोंबिवली स्टेशनवर आणि मी सुटकेचा निश्वास सोडला, अर्थात तिच्या नकळत!

    पूर्वी फोन नव्हते, तेव्हा एक बरं होतं. एकदा दृष्टीआड झाली की, परत येईपर्यंत छान मोकळीक असायची, डोक्याला फार ताप नसायचा… हल्ली सतत, केव्हा फोन वाजेल किंवा व्हिडीओ कॉल येऊन कपडे कसे वाळत घातलेत ते दाखव, ओटा आवरलाय का बघू, अशा आज्ञा येतील, याची भीती वाटत रहाते. पण असं धाकात असण्यात पण एक सुख असतं आणि तेही अनुभवायचं असतं याची खूणगाठ मी बांधून ठेवली आहे हल्ली मनाशी!

    जाताना लेकीलाही बजावून गेली. पोहे काढून ठेवलेत ओट्यावर, रविवारी सकाळी खायला कर. आजी पोळ्या देईल. भाजी कर आणि वरण-भाताचा कुकर लाव, वगैरे, वगैरे, वगैरे. कानाला बुचं लावून बसलेल्या लेकीच्या डोक्यात किती शिरलं, ते तिलाच ठाऊक!

    हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!

    रविवारी सकाळी मी नेहेमीप्रमाणे उठलो. रविवारी चहा करायचं दायित्व माझं असतं. ते मी आजही निभावलं. न्याहारीचं काय करावं, याचा विचार करत होतो. अशा प्रसंगात, हाकेच्या अंतरावर असलेला इडलीवाला हाच आधार असतो! मी निघतच होतो, पण तेवढ्यात लेक ‘भल्या पहाटे साडेनऊ’ला उठली. चहा घेतला आणि म्हणाली, ‘जाताच आहात खाली, तर इडल्या नका आणू. अंडी आणि ब्रेड घेऊन या…’

    मला वाटलं, आता अंड्याचं धिरडं येणार समोर… आवडतं तेही मला. म्हणून चार अंडी आणि अर्धा ब्रेड घेऊन आलो.

    “तुम्ही बाहेर बसा आता, इथे लुडबूड करू नका हो बाबा!!” 

    आईच्या पावलावर पाऊल अगदी! मी मुकाट्याने बाहेर जाऊन, पेपर हाती घेतला अन् जाहिराती सोडून उरलेला मजकूर वाचू लागलो… पाचच मिनिटांत मस्त दरवळ सुटला…

    “काय करतेयस काय?” असा प्रश्न विचारला मी पण, “झाल्यावर सांगते,”  म्हणून परत माझी बोळवण झाली आणि मी मुकाट बाहेर येऊन बसलो. जीव राहवेना… पण तेवढ्यात ती आली बाहेर… वाफाळती ताटली घेऊन. लसणीचा दर्प ल्यालेली…

    मी विचारलं, “काय आहे हे? नवीन काहीतरी पदार्थ दिसतोय.”

    “आधी खाऊन तर बघा!”

    मस्त भाजलेला पाव आणि त्यासोबत ते जे काही होतं, ते तोंडात टाकलं आणि आवडूनच गेलं एकदम!

    “मस्त लागतंय गं,” माझी एकमुखी दाद!

    “अहो, याला ‘Butter Garlic Scrambled Eggs’  म्हणतात.”

    थोडंसं अंडा भुर्जीसारखं, पण वेगळी चव… अंडी, लसूण, अमूल बटर, ओरेगानो, काळी मिरी, चिली फ्लेक्स वगैरेंचं ते चवदार मिश्रण मी पहिल्यांदाच चाखत होतो. ते ही लेकीने केलेलं! आडवा हात अपेक्षितच होता. भरपेट न्याहारी करून सुस्तावलो आणि सुखावलो.

    हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!

    लेकीला म्हटलं, “रविवारीय पोहे आणि अण्णाची इडली यापेक्षा वेगळं काहीतरी खायला घालून आजचा रविवार साजरा केलास तू.”

    माझं खाऊन होईस्तोवर, ही मेजवानी रीलच्या रूपात इन्स्टावर अवतरली सुद्धा आणि लगोलग बायकोचा फोन… “कसं होतं चवीला?” तिचा उत्सुक प्रश्न!

    “तुझा आहेच वरदहस्त तिच्या डोक्यावर, मग उत्तम आणि अप्रतिम याशिवाय दुसरं काय होणार?“

    “पुरे, मोडेल हो, हरभऱ्याचं झाड,” म्हणत कृतककोपाने हसली ती आणि आम्ही मग उरलंसुरलं निपटून, ओटा आवरून, रविवारच्या पुढच्या कार्यक्रमांकडे वळलो. आता जेवायला नवीन काय पानात येणार, याची उत्सुकता लागून राहिलीच मला… विचारलं असतं तर,  ‘आधी हे तर जिरू द्या ना हो बाबा,’ अशी कोपरखळी आली असती हे निश्चित, म्हणून मौन धारण करणं सयुक्तिक समजलं मी.

    असा मस्त रविवार उगवला आणि आता मावळत पण आला… उद्याच्या सोमवारची नकोशी चाहूल घेऊन!

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn